शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
2
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
3
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
4
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
5
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
7
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
8
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
9
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
10
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
11
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
13
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
14
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
15
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
16
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
18
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...
19
स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
20
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत

ठाण्यात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ३० जोडप्यांनी बांधली लग्नगाठ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 1:34 AM

नोंदणी कार्यालयात विवाहबद्ध : लॉकडाऊनमुळे रखडले होते सोहळे

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : विवाहसोहळा आणि विवाहमुहूर्ताची तारीख संस्मरणीय राहावी, यासाठी अनोख्या तारखेला विवाह करण्याची जोडप्यांमध्ये वेगळीच क्रेझ असते. शुक्रवारी, १ जानेवारीला नववर्षाच्या सुरुवातीला ३० जोडपे विवाहाच्या बंधनात अडकले. ठाणे जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला.एखादी अनोखी तारीख तसेच १४ फेब्रुवारी प्रेमाचा दिवस असो की, अक्षय तृतीया, गुढीपाडवा या दिवशी जोडप्यांकडून विवाह सोहळ्याचा हमखास मुहूर्त साधला जातो.  परंतु, यंदा मार्चपासून जगभरात कोरोनाची साथ पसरली. देशभरात लॉकडाऊन लागू झाल्याने अनेकांना हॉलमध्ये होणारे सोहळे रद्द करावे लागले होते. २३ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत, तसेच एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रायोगिक तत्त्वावर विवाह नोंदणी कार्यालय सुरू केले होते, परंतु कोरोनाची भीती असल्याने एकही विवाह झाला नाही. मार्च ते मे या महिन्यात विवाह मुहूर्त असल्याने मोठ्या प्रमाणात विवाहसोहळे होत असतात, परंतु कोरोनामुळे या विवाह सोहळ्यांना ब्रेक लागला होता. लॉकडाऊनचे निर्बंध असल्याने आणि एकत्र येण्यास बंदी असल्याने अनेकांनी विवाहसोहळे नोंदणी पद्धतीने केले. मे महिन्यात विवाह नोंदणी कार्यालयात विवाह करण्यास सुरुवात झाली. मे ते ऑगस्ट महिन्यात ३५०च्या आसपास विवाह झाले. पुढे अनलॉकमध्ये मर्यादित वऱ्हाडींच्या उपस्थितीत लग्न समारंभांना परवानगी देण्यात आली. त्यामुळे अनेकांनी आपला विवाह उरकून घेतला. तर आता काही जण नववर्षाच्या म्हणजेच जानेवारीच्या पहिल्या तारखेचा मुहूर्त साधून लग्नाच्या बेडीत अडकले. 

कोरोनाचे नियम पाळून दिला प्रवेशविवाहेच्छुक जोडप्यांनी एक महिना अगोदर नोटीस दिली होती. त्याप्रमाणे, कार्यालयीन वेळात ३० जोडप्याचे विवाह झाल्याचे प्रभारी दुय्यम निबंधक तथा विशेष विवाह अधिकारी गणपत पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. कोरोनामुळे आत जोडपे आणि तीन साक्षीदार धरून ५ जणांना प्रवेश दिला जात होता, तसेच कोरोनाचे सर्व नियम पाळणे हे त्यांना बंधनकारक होते, असे पवार यांनी सांगितले.

टॅग्स :marriageलग्न