उल्हासनगर : महापालिका नगररचनाकार विभागात १०० कोटींचा टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप भाजपा आमदार कुमार आयलानी, शहरजिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, प्रदीप रामचंदानी यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन खळबळ उडून दिली. घोटाळा संबंधितावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केल्याने, अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
उल्हासनगर महापालिका नगररचनाकार विभागात १०० कोटींचा टीडीआर व डीआरसी घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे तत्कालीन शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी दोन वर्षांपूर्वी करून खळबळ उडून दिली होती. त्यानंतर प्रहार पक्षाचे स्वप्नील पाटील यांनी टीडीआर घोटाळ्याचे प्रकरण लावून धरून चौकशीची मागणी महापालिका आयुक्ताकडे केली. दरम्यान ३ नोव्हेंबर २०२५ साली महापालिका नगररचनाकार विकास बिरारी यांनी टिडीआर-१४, १७ व १८ मधील दिलेला टिडीआर ज्या इमारती बांधकामात वापरण्यात आला. त्यांना त्याबाबत नोटीसा देवून दुसरा टीडीआर घेण्यास सांगण्यात आले. त्यानंतर भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, आमदार कुमार आयलानी व उल्हासनगर निवडणूक प्रमुख प्रदीप रामचंदानी यांनी पत्रकार परिषद घेऊन १०० कोटीच्या टीडीआर घोटाळ्याची माहिती देऊन महापालिका कारभारावर टिका केली.
भाजपाने महापालिका नगररचनाकार विभागातील १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करून, तत्कालीन महापालिका आयुक्त, नगररचनाकार, सहाय्यक संचालक नगररचनाकार, नगररचनाकार विभागाचे अभियंता यांच्यासह संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली. टिडीआर घोटाळ्याच्या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी झाल्यास, मोठे मासे फसण्याची शक्यता भाजपचे प्रदीप रामचंदानी यांनी व्यक्त केली. तर प्रहारचे स्वप्नील पाटील यांनी या घोटाळ्याचा पाठपुरावा केला असून याची व्याप्ती मोठी असल्याचे त्यांचे म्हणणे आहेत. याबाबत महापालिका नगररचनाकार विकास बिरारी यांच्या सोबत संपर्क केला असता झाला नाही.
टिडीआरची संचालकीय स्तरावर चौकशी नगररचनाकार विभागातील टिडीआर घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर, त्यासंबधीचा अहवाल व फाईल नगररचनाकार संचालक विभागाकडे चौकशीसाठी पाठविला आहे. सदर प्रकार सन-२०२४ चा असून संचालकीयस्तरावर चौकशी अंती निर्णय घेतला जाणार आहेत. (मनिषा आव्हाळे, आयुक्त उल्हासनगर महापालिका)
Web Summary : BJP alleges a 100 crore TDR scam in Ulhasnagar Municipal Corporation's town planning department. An inquiry is underway, with calls for action against those involved.
Web Summary : भाजपा ने उल्हासनगर महानगरपालिका के नगर नियोजन विभाग में 100 करोड़ रुपये के टीडीआर घोटाले का आरोप लगाया है। जांच जारी है, और इसमें शामिल लोगों के खिलाफ कार्रवाई की मांग की गई है।