शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

टीडीआर घोटाळ्यावरून सेना-भाजपात जुंपली

By admin | Updated: October 10, 2015 00:05 IST

टीडीआर घोटाळा हा सर्व पक्षांनी संघटित होऊन केलेला बदलापुरातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. यात अडकलेले शिवसेना आणि भाजपाचे पदाधिकारी स्वत:ला वाचवण्यासाठी

ठाणे : टीडीआर घोटाळा हा सर्व पक्षांनी संघटित होऊन केलेला बदलापुरातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. यात अडकलेले शिवसेना आणि भाजपाचे पदाधिकारी स्वत:ला वाचवण्यासाठी एकमेकांवर आरोप करण्यात व्यस्त झाले आहेत. भ्रष्टाचार करताना सोबत असलेले राजकारणी आता या प्रकरणातून वाचण्यासाठी मित्राचाच बळी देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे बदलापुरातील राजकीय वातावरण पूर्णत: दूषित झाले आहे. टीडीआर (विकास हस्तांतरण हक्क) हा घोटाळा प्राथमिक पातळीवर २० कोटींचा वाटत असला तरी तपासात या घोटाळ्याचा आकडा २०० कोटींपेक्षा अधिक जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास करणारे ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या घोटाळ्यात अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीची इत्थंभूत माहिती संकलित केली आहे. घोटाळ्यातील आर्थिक व्यवहार कोणत्या बँकेतून आणि कोणाच्या बँक खात्यातून कोणाकडे वर्ग झाले, याचीदेखील सखोल माहिती काढली आहे. तसेच या प्रकरणात आलिशान गाड्या भेट देणाऱ्यांचे आर्थिक व्यवहारदेखील तपासण्यात आले आहेत. घोटाळ्याशी संबंधित व्यक्तींच्या परदेश दौऱ्यांचीही माहिती काढली आहे. उच्च न्यायालयात घोटाळ्यांशी संबंधित भक्कम पुरावे सादर करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने कंबर कसली आहे. तपासाचा फास घोटाळेबहाद्दरांवर आवळला जात असताना त्यातून बचावासाठी अनेकांनी आपल्याच सहकाऱ्याचा बळी देण्याची तयारी ठेवली आहे. घोटाळे करताना एकी करणाऱ्या राजकारण्यांमध्ये आता मोठी दरी निर्माण झाली आहे. शिवसेनेचे नगराध्यक्ष वामन म्हात्रे आणि नगरसेवक तुषार बेंबाळकर यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यावर शिवसेनेनेदेखील भाजपावर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बदलापुरात शिवसेनाविरुद्ध भाजपा अशी आरोपांची लढत सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)माहितीच्या आधारावरुन इतरांवरही गुन्हे दाखल करणारया प्रकरणात तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी, सहायक नगररचनाकर सुनील दुसाने, नगर अभियंते अशोक पेडणेकर, तुकाराम मांडेकर, किरण गवळे आणि निलेश देशमुख यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे वामन म्हात्रे आणि नगरसेवक तुषार बेंबाळकर यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांना न्यायालयाने अटक न करण्याचे आणि तपासासाठी हजर होण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व आरोपींकडून माहिती घेण्यात येत आहे. या माहितीच्या आधारावर इतर आरोपींच्या विरोधातही गुन्हे दाखल होणार आहे.