शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
4
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
5
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
6
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
7
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
8
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
9
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
10
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
11
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
12
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
13
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
14
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
15
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
16
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
17
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
18
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
19
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
20
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

साध्या वाहनातून नको तर विमानाने लखनौला न्यावे: दुबेच्या साथीदारांची ठाणे न्यायालयात मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 01:54 IST

कुख्यात गुंड विकास दुबे याच्या वाहनाला झालेल्या अपघाताच्या थरारनाटयानंतरचा पूर्वानुभव लक्षात घेता कुठेही एखादा अपघात होऊ नये, यासाठी ठाण्यात पकडलेल्या दुबे याच्या दोन्ही साथीदारांना साध्या वाहनाऐवजी थेट विमानाने लखनौ येथे नेण्यात यावे, अशी मागणी आरोपीच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात रविवारी केली. उत्तरप्रदेश पोलीस त्यांचा ताबा घेण्यासाठी येईपर्यंत त्यांची नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे२१ जुलैपर्यंत मिळाली पोलीस कोठडीआरोपीच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात रविवारी केली मागणीतूर्त नवी मुंबईच्या तळोजा न्यायालयात झाली रवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: उत्तरप्रदेशमधील कुख्यात गुंड विकास दुबे याच्या वाहनाला झालेल्या अपघाताच्या थरारनाटयानंतरचा पूर्वानुभव लक्षात घेता कुठेही एखादा अपघात होऊ नये, यासाठी ठाण्यात पकडलेल्या दुबे याच्या दोन्ही साथीदारांना साध्या वाहनाऐवजी थेट विमानाने लखनौ येथे नेण्यात यावे, अशी मागणी आरोपीच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात रविवारी केली. दरम्यान, या दोघांनाही आता २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.दुबे याचे साथीदार अरविंद त्रिवेदी उर्फ गुड्डन रामविलास त्रिवेदी (४६)आणि सुशील कुमार उर्फ सोनू सुरेश तिवारी (३०) या दोघांना शनिवारी मुंबईच्या दहशतवादविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने ठाण्यातून ११ जुलै रोजी अटक केली. त्यांना रविवारी ठाण्याच्या विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश रश्मी झा यांनी या दोघांनाही न्यायालयीन कोठडी दिली. उत्तरप्रदेश पोलीस त्यांचा ताबा घेण्यासाठी येईपर्यंत त्यांना नवी मुंबईच्या तळोजी मध्यवर्ती कारागृहात ठेवले जाणार आहे.दरम्यान, दोघांनाही वाहनातून कानपूर येथे घेऊन जाण्याऐवजी हवाई मार्गे विमानातून लखनौ हवाईतळावर नेण्यात यावे, अशी मागणी आरोपी त्रिवेदी आणि तिवारी यांचे वकील अनिल जाधव यांनी ठाणे न्यायालयात अर्जाद्वारे केली. त्यांची कोरोना टेस्टही केली जाणार आहे. त्यानंतर त्यांचा ताबा उत्तर प्रदेश पोलिसांना दिला जाणार असल्याची माहिती निरीक्षक नायक यांनी दिली. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये झालेल्या आठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्या प्रकरणात विकास दुबे हा मोस्ट वॉन्टेड होता. तो पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत मारला गेल्यानंतर त्याचे साथीदार पसार झाले होते. त्यांच्यापैकीच दोघे ठाण्याच्या कोलशेत, ढोकाळी परिसरातील एका चाळीत लपल्याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी सकाळी दोघांनाही नायक यांच्या पथकाने अटक केली.विकास दुबेला नेतांना वाहनाला झालेला अपघात तसेच सध्याचा कोरोनाच्या प्रादुर्भावाची गंभीर स्थिती लक्षात घेता आरोपींच्या मनात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळेच ठाणे न्यायालयाकडे आरोपींना विमानाने पोलिसांनी लखनौला घेऊन जाण्याची विनंती केल्याचेही अ‍ॅड. जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक