शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

रस्तारुंदीकरण मोहिमेच्या कारवाईला स्थगिती

By admin | Updated: November 10, 2016 02:58 IST

एकीकडे पूर्वेतील केळकर मार्गावरील रहिवासी आणि व्यापाऱ्यांची रस्ता रुंदीकरणाच्या कारवाईबाबत विरोधाची भूमिका असताना दुसरीकडे पश्चिमेकडील

डोंबिवली : एकीकडे पूर्वेतील केळकर मार्गावरील रहिवासी आणि व्यापाऱ्यांची रस्ता रुंदीकरणाच्या कारवाईबाबत विरोधाची भूमिका असताना दुसरीकडे पश्चिमेकडील पं. दिनदयाळ मार्गाच्या रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्यांनी कारवाईला विरोध केला आहे. नुकत्याच राबविलेल्या स्वाक्षरी मोहिमेंतर्गत त्यांनी रस्ता-रुंदीकरणाला तीव्र विरोध दर्शवला असताना यात बाधित होणाऱ्या बंगलेधारकांनी कारवाईविरोधात कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने केडीएमसीच्या कारवाईला २३ जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे.शहरविकासाच्या नावाखाली रहिवाशांना रस्त्यावर आणण्याचा केडीएमसी प्रशासनाचा पवित्रा निषेधार्थ आहे. विश्वासात न घेता राबविली जाणारी मोहीम चुकीची आहे, असे मत कारवाई विरोधात लढणाऱ्या पं. दिनदयाळ मार्ग रहिवासी संघर्ष समितीने मांडले आहे. डोंबिवली पश्चिमेकडील द्वारका हॉटेल ते रेतीबंदर रोड हा पंडित दिनदयाळ मार्ग म्हणून ओळखला जातो. कल्याण-डोंबिवली महापालिकेने हाती घेतलेल्या रस्ता रुंदीकरण मोहिमेत शहरातील प्रमुख रस्त्यांमध्ये पं. दिनदयाळ मार्गाचाही समावेश आहे. या मोहिमेंतर्गत महापालिकेच्या ‘ह’ प्रभाग कार्यालयाने या मार्गावरील अनेक निवासी बांधकामांना नोटिसा बजावल्या आहेत. १८ इमारती व १४ बंगले आहेत. त्यात ४८८ कुटुंबे राहतात. याचबरोबर या कारवाईत ८५ दुकानेही बाधित होणार आहेत. या एकंदरीतच कारवाईत अंदाजे ३ हजार नागरिक विस्थापित होतील, असा दावा रहिवासी संघर्ष समितीचा आहे. १९९५-९६ मध्ये याच रस्त्याचे रुंदीकरण एकदा करण्यात आले आहे. त्यावेळी बाधित झालेले रहिवासी आणि व्यापारी यांना अद्यापपर्यंत याचा कोणताही मोबदला मिळालेला नाही, याकडे रहिवाशी संघाने लक्ष वेधले आहे. या कारवाईला काँग्रेसनेही विरोध दर्शवला आहे. या मार्गावर केल्या जाणाऱ्या रस्ता रुंदीकरणाचा जो विकास आराखडा सादर केला आहे, तो तीनवेळा वेगवेगळ्या प्रकारे सादर केल्याने महापालिका एकप्रकारे बाधितांची दिशाभूल करीत आहे, असा काँगे्रसचा आरोप आहे. (प्रतिनिधी)