शहरं
Join us  
Trending Stories
1
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
2
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
5
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
6
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
7
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
8
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
9
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
10
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
11
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
12
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
13
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
14
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
15
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
16
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
17
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
18
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
19
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना ना पुस्तके, ना वह्या

By admin | Updated: June 24, 2016 03:39 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शाळा सुरू होऊन महिना उलटल्यावच शालेय साहित्य मिळते.

जान्हवी मोर्ये,  कल्याण
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शाळा सुरू होऊन महिना उलटल्यावच शालेय साहित्य मिळते. यंदाही तोच शिरस्ता महापालिकेने पाळणार असल्याचे दिसत आहे. पहिल्या दिवशी तर सोडाच पण अजूनही त्यांना शालेय साहित्य मिळालेले नाही.
अगोदर विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता आणि आता महापालिकेने कंत्राटादाराला साहित्य खरेदीसाठी कार्यादेश दिले नसल्याने खरेदीच रखडली आहे. दरम्यान, यामुळे विद्यार्थी आणि पालक संतप्त झाले आहेत.
कल्याण-डोंबिवलीच्या ६७ शाळांमध्ये १० हजार ५०० विद्यार्थी आहेत. त्यांना महापालिका दरवर्षी गणवेश, बूट, दप्तर, रेनकोट आदी शालेय साहित्य पुरविते. या साहित्यांची वेळेवर खरेदी करून ते शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पडेल, यासाठी प्रशासनाने कधीच प्रयत्न केलेले नाहीत. शालेय साहित्यांच्या खरेदीसाठी महापालिकेने तीन कोटी २५ लाख रुपये खर्चास मान्यता दिली आहे. दोन वर्षांसाठी शालेय साहित्य खरेदीचा दर निश्चित करण्यात आला आहे. मागील वर्षी ज्या कंत्राटदाराने शालेय साहित्याची खरेदी करून विद्यार्थ्यांना त्याचा पुरवठा केला, त्याच कंत्राटदाराला कंत्राटदाराला महापालिकेने यंदा कार्यादेश देणे बाकी होते. दर वर्षी काही ना काही कारण सांगून शालेय साहित्याची खरेदी वेळेवर होत नाही. याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता यंदा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा विषय मार्गी लागू शकलेला नाही, असे सांगण्यात आले.
शिवसेनेचे माजी नगरसेवक कैलास शिंदे पाच वर्षे महापालिकेतील शाळांना शालेय साहित्य वेळेवर मिळावे, यासाठी झगडत होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळे विद्यार्थ्यांना दोन महिन्यांनी का होईना प्रशासनाकडून शालेय साहित्याचे वाटप केले जात होते. आता शिंदे नगरसेवक नसल्याने त्यांच्याऐवजी कोण पाठपुरावा करणार, हा खरा प्रश्न आहे. एकाही सदस्याला असा पाठपुरावा करून गरीब विद्यार्थ्यांना वेळेत साहित्य मिळावे, असे वाटत नाही. शिक्षण मंडळाच्या सदस्यांनी देखिल ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेली नाही.
महापालिका स्मार्ट सिटीसाठी २ हजार कोटींचा प्रस्ताव तयार करते. तसेच स्मार्ट सिटी शिखर परिषदेसाठी १५ लाखांचा खर्च करते. मात्र त्याच महापालिका हद्दीतील महापालिका शाळा स्मार्ट कशा होतील, याचा विचार करत नाही. विद्यार्थ्यांना कालानुरूप स्मार्ट शिक्षण मिळावे, यासाठी काहीच विचार झालेला नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे.