शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ खाडी देशांकडे मागितली भरपाई
2
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
3
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
4
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
5
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
6
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
7
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
8
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
9
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
10
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
11
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
12
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
13
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
14
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
15
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
16
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
18
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
19
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
20
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

...तरीही शर्यत जिंकण्याची आस

By admin | Updated: January 9, 2016 02:09 IST

सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनासह सार्वजनिक शौचालयांचा पुरता बट्ट्याबोळ झाला असतानाही उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या ठाणे महापालिकेने केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत

अजित मांडके, ठाणेसांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनासह सार्वजनिक शौचालयांचा पुरता बट्ट्याबोळ झाला असतानाही उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या ठाणे महापालिकेने केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात स्वच्छतेच्या बाबतीत देशातील ७५ पैकी पहिल्या १० शहरांमध्ये क्रमांक पटकावण्याचा दावा केला आहे. याअंतर्गत केंद्राच्या एका त्रिसदस्यीय समितीने सलग तीन दिवस संपूर्ण शहराचा दौरा करून शहरातील शौचालये, सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापनाची माहिती घेऊन त्याचे आॅडिट केले आहे. त्यानुसार, पालिकेला स्वच्छतेबाबत ही रँक दिली जाणार आहे. त्यानुसार, प्रशासनाने हा दावा केला आहे.महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात विविध प्रकारच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. अभियानात शहरातील शौचालये, साफसफाई, कचऱ्याची वाहतूक आणि विल्हेवाटीवर भर दिला आहे. त्यानुसार, महापालिकेची सध्याची स्थिती पाहता शहरात आजघडीला सुमारे ५४ हजारांच्या आसपास सार्वजनिक, वैयक्तिक आणि सामूहिक शौचालये आहेत. परंतु, यातील हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच शौचालयांची अवस्था चांगली असून उर्वरितांची दैना झाली आहे. दरवाजे नसणे, कडी नसणे, विजेची सोय नाही, दुर्गंधी आणि साफसफाईचा उडालेला बोजवारा यातूनच त्यांच्या खऱ्या अवस्थेचा विचार होऊ शकतो.दुसरीकडे घनकचरा व्यवस्थापनाचाही बोजवारा उडाला आहे. महापालिका हद्दीत आजच्या घडीला ६५० मेट्रीक टन कचऱ्याची निर्मिती होते. परंतु, गेल्या अनेक वर्षांत पालिकेला अद्यापही हक्काचे डम्पिंग मिळविता आलेले नाही. कचरा संकलन, वाहतूक जरी योग्य रीतीने होत असली तरी त्याची विल्हेवाट लावणे हा महत्त्वाचा प्रश्न आजही सोडविता आलेला नाही. एकूणच शौचालये आणि शहरातील कचऱ्याची अवस्था पाहता या दोन्ही यंत्रणांत पालिका सपशेल फेल ठरली आहे.दरम्यान, पालिकेने आता स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून अत्यंत घाईने कचऱ्याच्या शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाटीसाठी विविध प्रयोग हाती घेतले आहेत. यामध्ये वूडवेस्ट, बायोवेस्ट, गांडुळ खत प्रकल्प, मेडिकल वेस्ट, कम्पोस्टिंगसह विविध प्रकारचे प्रकल्प हाती घेतले आहेत. तर, संपूर्ण शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी सामूहिक १५००, वैयक्तिक १२००० आणि सार्वजनिक ५०० शौचालये उभारली आहेत. बायोटॉयलेटही उभारली जाणार आहेत. सांडपाणी व्यवस्थापनही लंगडे असून अनेक भागांत मलनि:सारण वाहिन्या टाकलेल्या नाहीत. तसेच अनेक ठिकाणचे सांडपाणी प्रक्रिया न करताच ठाणे खाडीत सोडले जात असल्याने ती कमालीची प्रदूषित झाली आहे.