शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी ८ हजार गर्भवतींची सोनोग्राफी

By admin | Updated: October 29, 2015 23:20 IST

जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम भागांतील गरोदर मातांना सोनोग्राफीची मोफत सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेकडून योग्य पावले उचलली आहेत.

ठाणे : जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम भागांतील गरोदर मातांना सोनोग्राफीची मोफत सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेकडून योग्य पावले उचलली आहेत. मात्र, रुग्णालयात मशीन असूनही हाताळणीसाठी तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने आरोग्य विभागाने या मातांना खाजगी रुग्णालयातून सोनोग्राफी करण्यास सुचवले होते. त्यानुसार, मागील सहा महिन्यांत जिल्ह्यातील ८ हजार २७० मातांनी खाजगी रुग्णालयातून सोनोग्राफी तपासणी केल्याचे बिल सादर केले आहे. त्यानुसार, प्रति गरोदर मातेला ६०० रु पयांचे अनुदान प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय त्यांच्या संख्येनुसार वितरीत केले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोनोग्राफीमुळे गर्भस्थ कुपोषित शिशूंची माहिती मिळवून त्यांच्यावर वेळीच औषधोपचार करता यावेत. तसेच अहवालाद्वारे अपंगत्वाची जाणीव होताच ते दूर करण्यासाठी प्रयत्न करता यावेत . यासाठी जिल्हा परिषदेने हा सोनोग्राफीची मोफत सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी चालू आर्थिक वर्षात सुमारे एक कोटी २५ लाखांची तरतूद केली आहे.आरोग्य विभागाचे उल्हासनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर अंबरनाथ आणि कल्याण परिसरातील गर्भवती मातांची मोफत सोनोग्राफी करतात. तसेच या परिसरातील गर्भवती मातांसाठी शासकीय रु ग्णालयात उपचारासाठी जाण्यास मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली आहे. तर, सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरांना दिवसाला चार हजार रु पयांचे मानधन देऊन आठवड्यातून दोन दिवस ही सुविधा सुरू आहे. शहापूर येथील रु ग्णालयात सोनोग्राफी मशीन आहे. परंतु, ती हाताळण्यासाठी रेडिओलॉजिस्ट च नाही. त्यामुळे ती बंद आहे. ती हाताळणाऱ्या डॉक्टरांना प्रतिदिन पाच हजार मानधन देण्याचे निश्चित केले असतानाही त्यासाठी डॉक्टर मिळत नाही. त्यावर तोडगा म्हणून या मातांना सोनोग्राफी करण्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर सहा महिन्यांत ८ हजार २७० मातांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधला. त्यानुसार, या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय मातांच्या संख्येनुसार ६०० रुपयांचे अनुदान दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी बी.एस. सोनावणे यांनी दिली. (प्रतिनिधी)