शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यामधील बाजारपेठांमध्ये सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 01:11 IST

दुचाकीच्याही रांगा । महापालिका, पोलिसांच्या आवाहनास फासला हरताळ

ठाणे : प्रतिबंधित क्षेत्र वगळता शुक्रवारपासून शहरातील प्रमुख बाजारपेठा खुल्या झाल्या. परंतु, पहिल्या दिवशी पालिकेच्या चुकीच्या आदेशामुळे गोंधळ उडाला होता. त्यानंतर सुधारीत आदेश काढल्यानंतर शनिवारपासून बाजारपेठा खुल्या झाल्या. मात्र, सकाळपासून नागरिकांनी जांभळीनाका, खारकर आळी, स्टेशन रोड, नौपाडा परिसरातील दुकांनांमध्ये गर्दी केली. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला.

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊननंतर शहरातील विस्कटलेली अर्थव्यवस्था शुक्रवारपासून सुरू झाली. यात अर्थव्यवहार हे सम आणि विषम तारखेलाच सध्या सुरूराहणार आहेत. त्यातही महापालिके च्या आदेशामुळे पोलीस आणि व्यापााऱ्यांमध्ये संभ्रम होता. अखेर शुक्रवारी सांयकाळी महापालिकेने सुधारीत आदेश काढून तो दूर केला. परंतु, त्यामुळे शुक्रवारी नौपाडा, जांभळीनाका येथील दुकाने बंद करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी सम आणि विषण तारखेनुसार दुकाने पुन्हा खुली झाली. या दुकांनामधून सामान घेण्यासाठी ठाणेकरांनी जांभळीनाका, खारखर आळी, नौपाडा भागातील दुकानांमध्ये एकच गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. यावेळी तोंडाला मास्क लावला असला तरी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत होते. खारकर आळीत तर दुचाकींच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे येथून पायी चालतांनादेखील तारवरची कसरत करावी लागत होती. विशेष म्हणजे ही दुकाने आता नेहमीच खुली राहणार असल्याने नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहनही महापालिका तसेच पोलिसांनी केले. मात्र, त्याकडे ठाण्यातील नागरिकांनी कानाडोळ केल्याचेच चित्र होते.दुकानाची वेळ बदलल्याने व्यापाऱ्यांचा विरोधअंबरनाथ : नगरपालिकेने दुकानदारांवर निर्बंध लादण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यातच सकाळी ७ ते १२ या वेळेत दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश काढल्याने त्याला अंबरनाथ व्यापारी संघटनेने विरोध केला आहे. शुक्रवारी पालिकेने नवीन आदेश काढत दुकाने केवळ सकाळी ७ ते १२ पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश काढले आहेत. मात्र, सकाळी ७ ची वेळ ही योग्य नसल्याचे मत व्यक्त करून व्यापाºयांनी ही वेळ बदलण्याची मागणी केली आहे. या कालावधीत ग्राहक दुकानात येणे शक्य नसल्याचे मत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष खानजी धल यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या