टिटवाळ्यात शिवसेनेचा धुव्वा

By Admin | Updated: November 3, 2015 01:12 IST2015-11-03T01:12:30+5:302015-11-03T01:12:30+5:30

कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीची मतमोजणीत अ प्रभागात प्रभाग क्र मांक ९ मध्ये भाजपाचा गड अबाधित राखून उपेक्षा भोईर पुन्हा एकदा निवडून आल्या, तर राष्ट्रवादी

The smile of Shivsena during Titav | टिटवाळ्यात शिवसेनेचा धुव्वा

टिटवाळ्यात शिवसेनेचा धुव्वा

टिटवाळा : कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीची मतमोजणीत अ प्रभागात प्रभाग क्र मांक ९ मध्ये भाजपाचा गड अबाधित राखून उपेक्षा भोईर पुन्हा एकदा निवडून आल्या, तर राष्ट्रवादी पक्षाने प्रथमच संतोष तरे यांच्या नावाने प्रभाग क्र मांक १० मध्ये विजयाचा जयघोष केला. तसेच मनसेच्या अपेक्षा भोईर यांनी विजय संपादीत करून प्रभाग क्र मांक ८ मध्ये बाजी मारली. या ठिकाणी शिवसेनेला मात्र पुरता पराभव पत्करावा लागला. प्रभाग क्र मांक ११ मधून मयूर पाटील यांनी आपल्या पत्नीला विजयी करून आपले वर्चस्व कायम ठेवले. या ठिकाणी भाजपातून शिवसेनेत गेलेले माजी महापौर बुधाराम सरनोबत यांना पक्षाचा एक ही उमेदवार यावेळी निवडून आणता न आल्याने शिवसेनेचा पुरता पराभव झाला आहे.

Web Title: The smile of Shivsena during Titav