शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

दुकानांच्या पाट्या राजभाषा मराठीत लावा अन्यथा आंदोलन करू, मनसेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2017 8:05 PM

मीरा-भार्इंदरमधील दुकाने, आस्थापनांच्या पाट्या मराठीतून हव्यात म्हणून मनसेने शहरातील दुकानदारांना पत्र देऊन १५ दिवसात नियमानुसार दुकानांच्या पाट्या राजभाषा मराठीत लावा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिलाय.

मीरा रोड - मीरा-भार्इंदरमधील दुकाने, आस्थापनांच्या पाट्या मराठीतून हव्यात म्हणून मनसेने शहरातील दुकानदारांना पत्र देऊन १५ दिवसात नियमानुसार दुकानांच्या पाट्या राजभाषा मराठीत लावा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिलाय. या शिवाय मराठी एकीकरण समितीने मराठी राजभाषेत पाट्या लावण्यासह लेखी आश्वासन देऊन देखील कारवाई न करणा-या पालिका अधिका-यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. यामुळे शहरात मराठी पाट्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय.दुकाने वा विविध आस्थापनांचे नामफलक हे प्रामुख्याने राजभाषा मराठीमध्ये लावले पाहिजेत, असे नियमात आहे. परंतु मीरा-भार्इंदरमध्ये सर्रास या नियमाचे उल्लंघन करून मराठी राजभाषेचा अवमान केला जातोय. मुंबई महापालिका एकीकडे मराठी भाषेत पाट्या नसल्यास खटले दाखल करून दंड वसूल करते. पण मीरा-भार्इंदरमध्ये मात्र महापालिकेचा परवाना विभाग तसेच शासनाचा दुकान - आस्थापना नोंदणी विभाग मात्र सातत्याने याकडे दुर्लक्ष करत आलाय.शहरात अन्य भाषिकांची संख्या जास्त असल्याने मतांसाठी प्रमुख राजकीय पक्ष देखील याकडे सोयीस्कर डोळेझाक करतात. तसे या आधी काही वर्षांपूर्वी मराठी भाषेत दुकाने - आस्थापनांच्या पाट्यांचा मुद्दा पेटला होता. परंतु काही काळाने पुन्हा तो बाजूला पडला. मराठी एकीकरण समितीने देखील १४ मार्च व १५ नोव्हेंबर २०१६ रोजी महापालिका आयुक्तांना पत्र देऊन शहरातील दुकाने-आस्थापनांचे नामफलक मराठी राजभाषेत हवेत म्हणून मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला होता. महापालिकेच्या परवाना विभागाने ५ जुलै २०१७ला मराठी भाषेत नामफलक लावण्याबाबत कारवाई केली जाईल, असे लेखी आश्वासन समितीला दिले होते. पण पुढे कारवाई मात्र काहीच झाली नाही.आता समितीचे उपाध्यक्ष सचिन घरत यांनी १७ नोव्हेंबर रोजी पुन्हा आयुक्त डॉ. नरेश गीते यांना पत्र देऊन दुकाने -आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत लावण्याबद्दल कार्यवाहीचे आश्वासन देऊन देखील त्याचे पालन न करणा-या पालिका अधिका-यांना निलंबित करा तसेच मराठी राजभाषेचा अवमान करणा-या दुकाने - आस्थापनांवर कारवाईची मागणी घरत यांनी केली होती. तोच मनसेने देखील मराठी नामफलकांचा मुद्दा हाती घेतला असून शहरातील दुकानदारांना मनसेच्या वतीने पत्र वाटप करण्यात आले आहे. दुकाना-दुकानांमध्ये जाऊन मनसैनिकांनी पत्र देऊन नामफलक मराठी भाषेत करून मराठी राजभाषेचा सन्मान राखा, असे आवाहन केले आहे.मराठी नामफलकासाठी आग्रह धरतानाच १५ दिवसांत मराठी भाषेत नामफलक केले नाहीत तर मनसे आपल्या पद्धतीने आंदोलन करेल, असा इशारा देखील दुकानदारांना दिला जात आहे. मराठी भाषेत नामफलक हवेत असे नियमाने बंधनकारक आहे. याची कल्पना प्रशासनासह दुकानदारांना देखील आहे. परंतु तरी देखील मराठीला डावलून अपमान केला जात असल्याने आम्ही आधी मराठीतून नामफलक लावण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. पालिका व गुमास्ता विभागास देखील कारवाई करण्यासाठी पत्र दिले आहे, असे मनसे शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी सांगितले.

टॅग्स :MNSमनसेmira roadमीरा रोडMira Bhayanderमीरा-भाईंदर