शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा माज उतरवायला शिवसेना समर्थ

By admin | Updated: October 29, 2015 23:29 IST

शिवसेनेचे बोट धरून आपण इथपर्यंत आलात, याची जाणीव ठेवा, मोठे व्हा, पण माजू नका अन्यथा माज उतरवायला शिवसेना समर्थ आहे

कल्याण : शिवसेनेचे बोट धरून आपण इथपर्यंत आलात, याची जाणीव ठेवा, मोठे व्हा, पण माजू नका अन्यथा माज उतरवायला शिवसेना समर्थ आहे, असा सज्जड इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याणच्या जाहीर सभेत भाजपला दिला.येथील पश्चिमेकडील यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथे शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्यांनी ठाकरी भाषेत भाजपसह मनसे आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा समाचार घेतला.२५ ते ३०वर्षांपूर्वी हिंदुत्त्वाला देशपातळीवर महत्त्व नव्हते तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी हिंदुत्व देशभर पोहोचविले. आता पाकिस्तानही याची दखल घेत असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या पाकिस्तानविरोधी आंदोलनाची खिल्ली उडवल्यावचा समाचार घेताना राष्ट्रवादाचे धडे आम्हाला त्यांनी शिकवू नये असा सल्ला त्यांनी दिला.पाकडयांना संरक्षण देणे म्हणजे देशभक्ती झाली का? असा सवालही त्यांनी केला. पाकडयांना संरक्षण देणाऱ्या औलादी महाराष्ट्रावर राज्य करीत आहेत ही दुर्देवाची बाब असल्याचे ते म्हणाले. शत्रू ते शत्रू आता मित्रही शत्रू झाले आहेत. निवडणुकीची लढाई ही साधीसुधी नाही. आतापर्यंत अनेक लढाया झाल्या, अगोदर विरोधक होते आता मित्रही अंगावर यायला लागले आहेत, अशा शब्दात त्यानी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेला गाडायला निघालेल्यांच्या, ७०० पिढ्याही काही करू शकणार नाहीत. एकनाथ खडसे! ही गर्दी येऊन बघा म्हणजे कळेल, असे आव्हान त्यांनी दिले. त्यांच्या बुडाखालच्या खुर्चीला बुडबुडे आल्याने ते बरळत असल्याचेही ठाकरे म्हणाले. आमच्या अंगावर येऊ नका २५ वर्षे तुम्ही दोस्ती पाहिली वाघाचा पंजा पाहिलेला नाही असा इशारा त्यांनी दिला. काही लोक नाशिकची बतावणी करीत मते मागत असल्याचा टोला राज यांना लगावून ते पुढे म्हणाले, होय मी शिवसेनाप्रमुखांच्या नावाने मते मागतोय त्यांच्या नाहीतर काय तुमच्या नावाने मत मागायची? कुत्रं तरी फिरकेल का अशा शब्दात त्यांनी राज यांच्यावर पलटवार केला.