शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

शिवसेना, भाजपची ऑफर धुडकावली; आव्हाड यांचा गौप्यस्फोट, पवारांची साथ न सोडण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 07:50 IST

मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत उद्धव ठाकरे यांनी आपल्याला ठाण्याचा जिल्हाप्रमुख होण्यासाठी ऑफर दिली होती, तसेच भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडून आमदारकीचा  प्रस्ताव आपल्यापुढे ठेवला होता, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्वीटद्वारे केला.

ठाणे : स्व. आनंद दिघे यांच्या निधनानंतर  मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत उद्धव ठाकरे यांनी आपल्याला ठाण्याचा जिल्हाप्रमुख होण्यासाठी ऑफर दिली होती, तसेच भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडून आमदारकीचा  प्रस्ताव आपल्यापुढे ठेवला होता, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्वीटद्वारे केला. ऑफर नाकारली तरी त्यावेळी मुंडे यांनी आपल्यावर कधीच आकस ठेवला नाही, असा टोला त्यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मोठ्या रकमेच्या आमिषाने बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जात असल्याच्या चर्चेला उधाण आले असताना आव्हाड यांनी आपल्या पक्षनिष्ठेचा भावनिक मुद्दा केला आहे. आपल्या राजकीय कारकीर्दीचा प्रवास मांडताना आव्हाड म्हणाले की, मी साधारण १९८७ मध्ये शरद पवार यांच्या संपर्कात आल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष झालो. त्यानंतरच्या दोन घटनांत आपल्यालाही पदाचे आमिष दाखवले गेले. एके दिवशी सकाळी ७ वाजता मुंडे यांनी प्रमोद महाजन यांच्याशी चर्चेनंतर आमदारकीचा प्रस्ताव माझ्यापुढे ठेवला होता. त्यावेळी पवार यांना सोडणार नाही, असे आपण त्यांच्या पत्नीमार्फत स्पष्ट कळवले होते. मात्र, माझ्या नकाराचा मुंडे यांनी कधीच आपल्यावर  राग ठेवला नाही. त्यानंतरही ते मला माेकळेपणाने सतत भेटत राहिले, अशी आठवणही आव्हाड यांनी सांगितली. दुसरी घटना, आनंद दिघे यांच्या निधनानंतरची आहे. रघुनाथ मोरे हे जिल्हाप्रमुख झाले. त्यांचाही अपघात झाला. त्याच काळात संघर्ष संस्थेच्या कार्यालयात देवीदास चाळके बसले होते. त्यावेळी  मिलिंद नार्वेकर यांनी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख होण्याची ऑफर दिली होती. मातोश्रीशी निष्ठावान राहील असा कोणीतरी आम्हाला जिल्हाप्रमुख करायचा आहे, तू विचार करून सांग, असे नार्वेकर म्हणाले. त्यावेळीही आपण पवार यांची साथ सोडणार नाही, तुम्ही माझा एवढा विचार केलात, त्याबद्दल मी आभारी असल्याचे नार्वेकर यांना म्हटले होते, असे आव्हाड यांनी सांगितले.

हिशेबावर निष्ठा ठरत नसतात -- २०१४ आणि २०१९ मध्ये पवार यांनी आपल्याला मंत्री केले. -  सर्वच राजकीय संकटांमध्ये  ते कायम पाठीशी उभे राहिले. -  त्यामुळे काही मिळो किंवा न मिळाे आपण त्यांची साथ सोडणार नाही. -  हिशेबावर निष्ठा ठरत नसतात, असा टोला आव्हाड यांनी स्वपक्षाच्या माजी नगरसेवकांना लगावला. -  तुम्हाला ज्यांनी घडविले, त्यांच्यासोबत तुम्ही घडल्यावर कसे वागता, याचा विचार प्रत्येक माणसाने स्वत:हून करायला हवा. -  स्वत:ला भाव लावून विकणाऱ्यांची किळस येते, अशा शब्दांत त्यांनी माजी नगरसेवकांना कानपिचक्या दिल्या.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस