शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेसेनेकडूनही आळवला जातोय ‘एकला चलो’चा सूर; पदाधिकाऱ्यांनी धरला आग्रह; भाजपविरोधी वातावरणनिर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 09:05 IST

ठाण्यात शिंदेसेना विरुद्ध भाजप यांच्यात मागील काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : भाजपकडून ठाण्यात वारंवार स्वबळाचा नारा दिला जात आहे. आता शिंदेसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा आग्रह धरला आहे. आनंद आश्रम येथे खा. नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत बुधवारी रात्री झालेल्या संघटनात्मक बैठकीत ही मागणी करण्यात आली.   बैठकीत अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपविरोधात नाराजी व्यक्त केली.

 ठाण्यात शिंदेसेना विरुद्ध भाजप यांच्यात मागील काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. वनमंत्री गणेश नाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. खा. म्हस्के हे गणेश नाईक यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील पालिका निवडणुका दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार की, महायुतीत लढणार याविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. 

म्हस्के यांनी काढली समजूतदोन दिवसांपूर्वी भाजपचे आ. संजय केळकर यांनी ठाण्याचा महापौर भाजपचा झाला पाहिजे, हीच आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असे सांगितले होते. . त्यापाठोपाठ ठाणे पालिकेच्या एकूण ३३ प्रभागांतून निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांसाठी भाजपने मार्गदर्शन शिबिर आयोजित करून एकप्रकारे स्वबळाची चाचपणी सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे.  शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या विकासकामांमध्ये भाजपचे काही पदाधिकारी अडथळे आणत असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी केल्या. यावेळी म्हस्के यांनी नाराज माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत महायुती म्हणून लढण्याची आमची इच्छा आहे. पण, समोरच्यांची इच्छा नसेल तर स्वतंत्रपणे लढण्यासाठीही आम्ही तयार आहोत. राज्यातील महायुतीचे नेते जो निर्णय घेतील, त्याचे पालन करणे हे आमचे कर्तव्य आहे.नरेश म्हस्के, खासदार, शिंदेसेना

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde Sena echoes 'Go Solo' call amid BJP tensions in Thane.

Web Summary : Shinde Sena leaders in Thane are pushing to contest elections independently due to disagreements with BJP. Accusations and counter-accusations are exchanged, fueling speculation about the future of their alliance in upcoming Thane municipal elections. Despite internal pressure, leaders emphasize adherence to the state alliance's decision.
टॅग्स :Shiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक 2024