शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

सेव्हन इलेव्हन एज्युकेशन सोसायटीला मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांचा दणका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 18:39 IST

मीरा रोड - भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या पत्नी सुमन यांच्या सेव्हन इलेव्हन एज्युकेशन सोसायटीला ९७ लाख ४० हजार थकीत मुद्रांक शुल्क व त्यावर २००८ साला पासून प्रतिमाह २ टक्के प्रमाणे दंड २१ ऑगस्ट पर्यंत भरण्याची नोटीस मुद्रांक जिल्हाधिकारी ठाणे यांनी बजावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरा रोड - भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या पत्नी सुमन यांच्या सेव्हन इलेव्हन एज्युकेशन सोसायटीला ९७ लाख ४० हजार थकीत मुद्रांक शुल्क व त्यावर २००८ साला पासून प्रतिमाह २ टक्के प्रमाणे दंड २१ ऑगस्ट पर्यंत भरण्याची नोटीस मुद्रांक जिल्हाधिकारी ठाणे यांनी बजावली आहे. दंडा सह ही रक्कम काही कोटीत आहे. 

मीरारोड पूर्वेला सेव्हन स्क्वेअर अकादमी ही शाळा आहे. सदर जमीन व शाळा इमारत ही भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कंस्ट्रक्शन कंपनी कडून त्यांची पत्नी सुमन मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन एज्युकेशन सोसायटीने २००८ साली ३० वर्षाच्या नाममात्र भाडेपट्ट्याने घेतली. 

भाडेकरार करताना नियमानुसार नोंदणी व मुद्रांक शुल्क भरण्यात आला नसल्याने शासनाचा महसूल बुडवून फसवणूक केल्या प्रकरणी फौजदारी कारवाई करावी आणि मुद्रांक शुल्क दंडा सह वसूल करावे अश्या तक्रारी २०१३ साला पासून केल्या जात होत्या. 

ठाणे शहरचे प्रभारी मुद्रांक जिल्हाधिकारी तानाजी गंगावणे यांनी २३ जुलै रोजीच्या तारखेची नोटीस सेव्हन इलेव्हन एज्युकेशन सोसायटीच्या सुमन मेहता यांना बजावली आहे. सदर नोटीस मध्ये या बाबत २०१४ साली तक्रार झाली होती. १० नोव्हेंबर २०१६ रोजी सुनावणी नोटीस बजावण्यात आली होती. २६ ऑक्टोबर २०२० रोजी अंतिम आदेश देण्यात आला होता.

९९२६ चौ मी जमीन क्षेत्रातील एकूण ७८ हजार चौ मी ची शाळा इमारत आहे. त्याचे मुद्रांक शुल्क ९७ लाख ४० हजार १०० रुपये इतके भरण्यात आले नव्हते. सदर मुद्रांक शुल्क सह दस्त केल्याच्या तारखे पासून प्रतिमाह २ टक्के प्रमाणे दंड अशी रक्कम नोटीस बजावल्याच्या तारखे पासून ३० दिवसात भरावी. रक्कम भरली नाही तर सक्तीच्या कारवाईचा इशारा मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी नोटीस मध्ये दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकरणी कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत होते.

टॅग्स :mira roadमीरा रोडMaharashtraमहाराष्ट्रSchoolशाळा