मोटारीच्या धडकेत सुरक्षारक्षक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:27 IST2021-06-11T04:27:35+5:302021-06-11T04:27:35+5:30

ठाणे: मोटारकारच्या धडकेत नितेश विनेरकर (३५, रा. कशेळी, भिवंडी ) हा मोटारसायकलवरून जाणारा सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी ...

Security guard injured in car crash | मोटारीच्या धडकेत सुरक्षारक्षक जखमी

मोटारीच्या धडकेत सुरक्षारक्षक जखमी

ठाणे: मोटारकारच्या धडकेत नितेश विनेरकर (३५, रा. कशेळी, भिवंडी ) हा मोटारसायकलवरून जाणारा सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. याप्रकरणी कारचालक संजीवन मनाकारा (३६, रा. ऐरोली, नवी मुंबई) याच्याविरुद्ध चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडीतील रहिवासी असलेले नितेश हे सुरक्षारक्षक ८ जून रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पातलीपाडा ब्रिजच्या खालून घोडबंदर रोडने जात होते. त्याचवेळी भरघाव वेगाने आलेल्या संजीवन मनाकारा यांच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात नितेश यांच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूला तसेच डाव्या पायाच्या टाचेच्या वर पायाचे हाड फ्रॅक्चर झाले. जखमी नितेश यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. चितळसर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पी. एन. शिंदे या अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Security guard injured in car crash