शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन माहितीसाठी शाळांना वाढीव तीन दिवस मिळणार

By admin | Updated: September 29, 2015 01:08 IST

‘सरल’ प्रणालीच्या वेबसाइटवरील ताण कमी करण्यासाठी जिल्ह्यातील शाळा, शैक्षणिक संस्थांना त्यांच्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाइन लोड करण्यासाठी ठरावीक मुदत दिली होती

ठाणे : ‘सरल’ प्रणालीच्या वेबसाइटवरील ताण कमी करण्यासाठी जिल्ह्यातील शाळा, शैक्षणिक संस्थांना त्यांच्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाइन लोड करण्यासाठी ठरावीक मुदत दिली होती. परंतु, त्यातील तीन दिवसांचा कालावधी सुटीत गेल्यामुळे राहिलेल्या एका दिवसाच्या कार्यालयीन वेळेत १५ लाख विद्यार्थ्यांची माहिती लोड करणे शक्य नाही. त्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची वाढीव तीन दिवसांच्या मुदतीसाठी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकांकडे मागणी केली आहे.कोकणातील शाळांची माहिती आॅनलाइन भरण्यासाठी २५ ते २८ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. या कालावधीत रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांपेक्षा ठाणे जिल्ह्यात १५ लाख विद्यार्थ्यांची माहिती एका दिवसात लोड करणे शक्य नाही. यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत वाढीव मुदतीची मागणी उपसंचालकांकडे केली असल्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील १५ लाख १६ हजार २९५ विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती आॅनलाइन संकलित केली जाणार आहे. सर्व शैक्षणिक संस्था,शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी आदींची वैयक्तिक माहिती राज्य शासनाच्या शालेय विभागाव्दारे आॅनलाइन संकलित केली जात आहे. यासाठी सरल प्रणाली सुरू केली आहे. त्याव्दारे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्राची इत्थंभूत माहिती आॅनलाइन लोड केली जाणार आहे. त्यासाठी वाढीव मुदतीची मागणी केली असून ती जवळजवळ मान्य झाल्याचे सूतोवाच शेंडकर यांनी केले.