महामार्गावर रात्री ११ नंतर सामसूम

By Admin | Updated: December 28, 2015 01:59 IST2015-12-28T01:59:56+5:302015-12-28T01:59:56+5:30

मुंबई-अहमदाबाद महामार्ग लगत असलेले हॉटेल, ढाबे, कॅन्टींन रात्री ११ नंतर बंद झाल्याने महामार्ग सामसूम होत असून वाहनचालकांचे हाल होत आहेत

Samasoom after 11 pm on the highway | महामार्गावर रात्री ११ नंतर सामसूम

महामार्गावर रात्री ११ नंतर सामसूम

अरिफ पटेल, मनोर
मुंबई-अहमदाबाद महामार्ग लगत असलेले हॉटेल, ढाबे, कॅन्टींन रात्री ११ नंतर बंद झाल्याने महामार्ग सामसूम होत असून वाहनचालकांचे हाल होत आहेत.मनोर पोलीस ठाण्यात नव्याने एस. बी. धुमाळ उपविभागीय पोलीस अधिक्षक यांनी चार्ज घेतल्याने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील रात्रभर चालणारे हॉटेल, ढाबे, कॅन्टींन बंद केले. रात्री फक्त ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्याच्या सूचना केल्यामुळे रात्री ११ नंतर वाहनचालकांना जेवण, चहा मिळत नाही. त्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. तसेच तीनआसनी व सहा आसनी रिक्षा, मॅजीकमध्ये अवैध प्रवाशांची वाहतूक सुरू होती तीही आता नियमानुसार होते आहे. त्यापेक्षा जास्त प्रवासी आढळले तर त्यांच्यावर गुन्हे नोंद केले जात आहेत. धुमाळ यांनी मनोर पोलीस ठाण्याचा पदभार सांभाळल्यापासून परिसरात नियमांचे पालन होताना दिसत आहे.

Web Title: Samasoom after 11 pm on the highway