शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

कामाचा ताण नसल्याची मोहन ग्रुपची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2016 02:37 IST

अमर भाटिया यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाला बुधवारी ख-या अर्थाने सुरुवात झाली असून रेल्वे पोलिसांनी मोहन ग्रूपचे सर्वेसर्वा जितेंद्र मोहनदास यांची चौकशी केली.

पंकज पाटील ,  अंबरनाथअमर भाटिया यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाला बुधवारी ख-या अर्थाने सुरुवात झाली असून रेल्वे पोलिसांनी मोहन ग्रूपचे सर्वेसर्वा जितेंद्र मोहनदास यांची चौकशी केली. मोहन ग्रुपच्या कामाचा आणि आर्थिक व्यवहाराचा कोणताही ताण अमर यांच्यावर नसल्याची भूमिका या चौकशीवेळी जितेंद्र यांनी मांडली. त्यामुळे पोलिसांना व्यावसायिक कारणांसोबत इतर कारणेही तपासावी लागणार आहेत.अमर भाटिया यांनी मामा हरीश भाटिया यांना एसएमएस करुन आत्महत्या करीत असल्याचे कळवले होते. पण त्यांनी आत्महत्या करण्याइतपत काय घडले, हे कोडे त्यांच्या निकटवर्तीयांना सुटलेले नाही. आत्महत्येमागचे कारण शोधण्यासाठी पोलिसांची यंत्रणाही कामाला लागली आहे. ठाण्याच्या परमार प्रकरणाप्रमाणे हे प्रकरण असल्याचा संशय व्यक्त झाल्याने मोहन ग्रुप या संदर्भात काय खुलासा करेल, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. अखेर पोलीसांनी चौकशीसाठी बुधवारी जितेंद्र यांना बोलावले असता त्यांनी मोहन ग्रुपच्या सर्व आर्थिक व्यवहारांची आणि कामाची माहिती पोलिसांपुढे ठेवली. मोहन ग्रुपचे १२ मोठे प्रकल्प बदलापूरात सुरु असुन सहा हजार घरे बांधली जात आहेत. या प्रकल्पातील प्रत्येक कामाची जबाबदारीही वाटून देण्यात आली आहे. इमारतीच्या बांधकामाची परवानगी घेणे असो की जागेचा व्यवहार करणे असो या सर्वांसाठी मोहन ग्रुपची स्वतंत्र यंत्रणा आहे. त्यामुळे अमर यांना त्या कामाचा कोणताच ताण नव्हता. सुरु असलेल्या इमारतीच्या कामावर केवळ देखरेखीची जबाबदारी त्यांच्यावर होती, असे पोलिसांकडे स्पष्ट करण्यात आले. आर्थिक व्यवहारांसाठी स्वतंत्र यंत्रणा होती. मोठ्या प्रमाणात प्रकल्पाची कामे सुरू असल्याने आर्थिक चणचणीचा कोणताच प्रश्न मोहन ग्रुपपुढे नव्हता. मोहन ग्रुपचे ते संचालक असल्याने त्यांच्या एकट्यावर कोणतेच मोठी जबाबदारी नव्हती. कंपनीचे काम पाहण्यासाठी १६ संचालकांची टीम काम करीत आहे. आमच्या कोणत्याही प्रकल्पाला आतापर्यंत कोणतीही अडचण शासनामार्फत किंवा स्थानिक शासकीय यंत्रणेमार्फत झालेली नाही. सर्व प्रकल्प नियमानुसार असल्याने कोणत्याही तक्रारीला वाव नव्हता. त्यामुळे अमर यांनी आत्महत्या का केली हे कोडे आम्हालाही सुटलेले नाही, असे म्हणणे जितेंद्र यांनी पोलिसांपुढे मांडले. अमर भाटिया यांचे मामा हरी भाटिया हे देखील मोहन ग्रुपमध्ये संचालक असून त्यांनीही कंपनीत कोणताही तणाव नव्हता, याला दुजोरा दिला. असा तणाव निर्माण होण्यास वाव नव्हता, असे म्हणणे त्यांनी पोलीसांसमोर मांडले. सर्व सुरळीत असतांना हा प्रकार घडल्याने आम्हालाही धक्का बसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.