शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

झाडे न तोडताच रस्त्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:43 IST

पालिकेचा अजब कारभार; दोन कोटीचा खर्च

उल्हासनगर : हिराघाट रस्त्याच्या आड येणारी झाडे न तोडता थेट कामाला सुरूवात केल्याने पालिकेचा अजब कारभार उघड झाला आहे. सतर्क नागरिकांनी याबाबत आवाज उठविल्यावर रस्त्याचे काम अर्धवट टाकून वृक्ष समितीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.उल्हासनगर महापालिकेने काही महिन्यांपूर्वी २ कोटीच्या निधीतून हिराघाट ते गार्डन रस्त्याचे काम सुरू केले. नवीन शहर विकास आराखडयानुसार रस्ता पालिका गार्डनच्या एका बाजूला जात असून रस्त्याच्या आड १५ पेक्षा जास्त जुनी झाडे आहेत. रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी आड येणारी झाडे परवानगी घेऊन तोडायला हवी होती. मात्र तसे न करता महापालिकेने थेट रस्त्याचे काम सुरू केले. याबाबत पर्यावरणप्रेमींनी आवाज उठविला. अखेर महापालिकेने रस्त्याचे काम अर्धवट सोडून झाडे तोडण्यासाठी वृक्ष प्राधिकरण समितीचा अभिप्राय व परवानगी मागितली. मागील महासभेत वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना झाली. आधी रस्ता मग झाडाच्या कत्तलीचा परवाना असा अजब प्रकार महापालिकेत उघड झाला आहे. येथील गार्डनची दुरवस्था झाली असून पूर्वी येथे नागरिक, मुले फिरायला येत होती. सध्या खाजगी गाडयांचे वाहनतळ झाले आहे. तसेच गार्डनवर अतिक्रमण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.