शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत; मुरबाडमध्ये मृत्यू; आरोग्य केंद्रे २४ तास सुरू

By सुरेश लोखंडे | Updated: August 19, 2025 08:57 IST

अतिवृष्टीचा इशारा असल्याने आज पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर

सुरेश लाेखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर सोमवारी अधिकच वाढल्याने अनेक शहरांना फटका बसला. अनेक सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. घोडबंदर आणि नाशिककडे जाणारी रस्ते वाहतूक आणि उपनगरीय रेल्वे वाहतूक सोमवारी बाधित झाली. उल्हास नदीसह अनेक नदी-नाल्यांना पूर आला. पावसाचा जोर पाहून दुपारच्या सत्रातील शाळांना सुटी जाहीर केली व मंगळवारी अतिवृष्टीचा इशारा असल्याने पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली.

जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला; पण सर्वाधिक १०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊसठाणे शहरात झाला. शहरी भागात पावसाचा अधिक जोर होता. कल्याण-नगर महामार्गावरील दुरुस्ती कामांमुळे वाहतूक ठप्प झाली असून, माळशेज घाटात वाढलेले धुके चालकांसाठी आव्हान ठरले. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना काळजी घेण्याचा सल्ला प्रशासनाने दिला. तसेच जिल्ह्यातील अतिवृष्टीचा आढावा घेण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साेमवारी ऑनलाइन बैठक घेतली.

मुरबाडमध्ये बुडून मृत्यू

संततधार पावसामुळे मुरबाड तालुक्यातील दूधनाेली येथील समीर संताेष राऊत (वय २५) या तरुणाचा पाडाळ येथील तलावात बुडून मृत्यू झाला, तर शहापूरमध्ये एक कच्चे घर कोसळले; मात्र जीवितहानी झाली नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आरोग्य केंद्रे २४ तास सुरू

जिल्हा आरोग्य विभागाने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, आरोग्य पथक व जि. प. दवाखाने २४ तास सुरू ठेवण्याचे आदेश दिले. पुरेशी औषधे, विशेषत: सर्प, विंचू, श्वान दंशासाठी लागणाऱ्या लस व औषधांचा साठा ठेवण्याचे आवाहन केले. याशिवाय पूरस्थितीत काही गावांचा संपर्क तुटू शकतो, असे लक्षात घेऊन गरोदर व स्तनदा मातांचे सुरक्षित स्थलांतर करण्यासाठी समन्वय साधण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस