शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

मीरा रोडमध्ये रेमडेसिविरची काळ्या बाजारात विक्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 05:41 IST

मीरा रोड भागात रेमडेसिविर इंजेक्शन काळ्या बाजारात विकली जात असल्याची माहिती परिमंडळ १चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांना मिळाली.

 

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : एकीकडे कोरोनावर उपयुक्त ठरणाऱ्या रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचा तुटवडा भासत असताना होण्याच्या घटना वाढत आहेत. मीरा रोडमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्या बाजारात तब्बल १६ हजार रुपयांना विक्री करणाऱ्या योगेश संतोष पवार (२१) रा. वांद्रे व अस्मिता नारायण पवार (२१) रा. नालासोपारा या दोघांना पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या पथकाने अटक केली. दोघेही वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी असून त्यांच्याकडून रेमडेसिविरची पाच इंजेक्शन जप्त करण्यात आली.मीरा रोड भागात रेमडेसिविर इंजेक्शन काळ्या बाजारात विकली जात असल्याची माहिती परिमंडळ १चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांना मिळाली. काळे यांच्या पोलीस पथकाने लाइफलाइन रुग्णालयात काम करणारी अस्मिता हिच्याकडे इंजेक्शनसाठी बनावट गिऱ्हाईक पाठवले असता तिने योगेशला सांगितले. योगेशने बोरिवलीच्या खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या एका महिलेस कळवले. एका इंजेक्शनची १६ हजार रुपये किंमत ठरवून योगेश व अस्मिताला भाईंदर उड्डाणपुलाखाली असलेल्या शिधावाटप कार्यालयाजवळ पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून एकूण पाच इंजेक्शन पोलिसांनी जप्त केली आहेत.पोलिसांनी दोघांना अटक करून नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना ठाणे न्यायालयात हजर केले असता २४ एप्रिलपर्यंत त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे. पुढील तपास नयानगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुहेल पठाण हे करीत आहेत. योगेश हा महापालिकेने कंत्राटी पद्धतीने चालवण्यास दिलेल्या भाईंदरच्या प्रमोद महाजन कोविड उपचार केंद्रातील आयसीयू विभागात काम करणारा कर्मचारी आहे. महाजन उपचार केंद्रात मृत्यू पावलेल्या रुग्णाच्या नातलगाकडे रेमडेसिविरचे एक इंजेक्शन शिल्लक होते. ते ४ हजार ८०० रुपयांना नातलगाने त्याला विकले होते, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. पोलीस बोरिवलीच्या रुग्णालयातील त्या महिलेचा शोध घेत आहेत.दोघांना अटक; दोघेही वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी; तब्बल १६ हजार रुपयांना विकले रेमडेसिवीर