शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वर्धापनदिनाचा प्रशासनाला विसर

By admin | Updated: October 12, 2016 04:28 IST

भिवंडी नगरपालिकेची १० आॅक्टोबर १८६४ मध्ये स्थापना झाली. २००१ मध्ये महापालिका म्हणून अस्तित्वात आली. पालिकेला १५१ वर्ष पूर्ण होऊन वर्षभरात एकही कार्यक्रम न

पंढरीनाथ कुंभार / भिवंडीभिवंडी नगरपालिकेची १० आॅक्टोबर १८६४ मध्ये स्थापना झाली. २००१ मध्ये महापालिका म्हणून अस्तित्वात आली. पालिकेला १५१ वर्ष पूर्ण होऊन वर्षभरात एकही कार्यक्रम न केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. लोकप्रतिनिधींना विसर पडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.इंग्रजांच्या काळात भिवंडी निजामपूर नगरपालिकेस १० आॅक्टोबर १८६४ मध्ये मान्यता मिळाली. नगरपालिकेची भिवंडी नगरपालिका झाल्यानंतर जकात उत्पन्नातून शहराची प्रगती झाली. महाराष्ट्रात सर्वात जास्त उत्पन्न असणारी नगरपालिका म्हणूनही नावाजली. २००१ मध्ये भिवंडी महापालिका अस्तित्वात आल्यानंतर शहराचे रूप पालटेल अशी स्थानिकांची अपेक्षा होती. परंतु राज्य सरकारने जकात उत्पन्न बंद केले आणि नगरसेवकांची मानसिकता नसल्याने शहरासाठी विशेष धोरणात्मक काम झाले नाही. त्यामुळे नागरिकांना आजही विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. भ्रष्ट कारभाराचा कळस आणि लोकप्रतिनींधीचे दुर्लक्ष यामुळे सध्या महापालिका आर्थिक संकटात आहे. शहराला कुणीही वाली नाही. शहराच्या विकासासाठी राज्य सरकारकडून निधी आणल्याचा प्रचार नेते करत असले तरी शहराच्या स्थितीत सुधारणा झालेली नाही.