शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शुद्ध निर्जंतूक पेयजल जलदूत वाहन लोकार्पण

By admin | Updated: September 29, 2015 23:50 IST

मोखाडा तालुक्यांतील डोल्हारा आणि साखरी या गावातील पाणीटंचाई तसेच प्रदूषित पाण्यापासुन होणारे आजार टाळण्यासाठी शुद्ध निर्जतुक पेयजल जलदूत वाहन

मोखाडा : मोखाडा तालुक्यांतील डोल्हारा आणि साखरी या गावातील पाणीटंचाई तसेच प्रदूषित पाण्यापासुन होणारे आजार टाळण्यासाठी शुद्ध निर्जतुक पेयजल जलदूत वाहन लोकार्पणाचा कार्यक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला होता. साय - टेक, पुणे आणि मुंबई येथील ईसीजीसी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. तालुक्यांतील अनेक गावे डोंगरावर वसलेली असुन पिण्याचे पाणी मात्र खोल दरीत अशी अवस्था असल्याने पाणी पुरवठ्याची योजना व जलदुत वाहन योजना ही जास्तीत जास्त गावांत राबवणार असल्याचे सांगितले तसेच तालुक्यांतील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करुन स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध करण्यासाठी, तसेच कुपोषण मुक्तीसाठी शासन प्रयत्नशील असून या भागाचा विकास हाच आमचा ध्यास असल्याचे पालकमंत्री सवरा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. जव्हार, मोखाड्यातील अनेक गावांत जलशुध्दीकरणाचा अभाव असल्याने जास्तीत जास्त गावांसाठी ही योजना शासन तसेच संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राबवणार असुन स्थानिक प्रशासनाने याची काळजी घेण्याची गरज असल्याचे पालघर जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी यावेळी सांगितले. यावेळी खा. चिंतामण वनगा, पालघर जि.परीषद अध्यक्षा सुरेखा थेतले, जि. प. उपमुख्यकार्यकारी अधिकारी चव्हाण, प्रांतअधिकारी हरिश्चंद्र पाटील तसेच भारत सरकार पुरस्कृत साय-टेक जलदुत पुणे चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगदाळे, ई. सी. जी. सी. मुंबई च्या व्यवस्थापकीय अध्यक्षा गीता मुरलीधर, मोखाडा तहसीलदार पिरजादा, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी लोमेश सलामे, मोखाडा पं. स. सभापती सारिका निकम, बी. डी. ओ. पी. गोडांबे, देविदास पाटील, जि. प सद्स्य प्रकाश निकम, बाबुराव दिघा, जि. प सद्स्य दिलीप गाटे, संतोष चौथे, ईश्वर गोविंद, साखरी व डोल्हारा ग्रामपंचायत सरपंच, सदस्य आदी तालुक्यांतील पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते. (वार्ताहर)