शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाच्या धडक मोहिमेसाठी यंत्रणा सज्ज

By admin | Updated: October 8, 2015 00:12 IST

ठाणे जिल्ह्यात पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांचे प्रमाण कमी असल्याने पुन्हा एकदा लसीकरणाची मोहीम धडाक्याने राबविण्यात येणार असून संबंधित सर्व आरोग्य यंत्रणा

ठाणे : ठाणे जिल्ह्यात पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांचे प्रमाण कमी असल्याने पुन्हा एकदा लसीकरणाची मोहीम धडाक्याने राबविण्यात येणार असून संबंधित सर्व आरोग्य यंत्रणा व महानगरपालिका यांनी चांगला समन्वय ठेऊन ही मोहीम यशस्वी करावी त्याचबरोबर अंगणवाड्यांनाही यात सहभागी करून घेण्यात यावे अशा सुचना निवासी उप जिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी वैद्यकिय अधिकाऱ्यांना दिल्या. ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुके, महानगरपालिकांच्या क्षेत्रात या महिन्यांपासून ‘‘ इंद्रधनुष्य मिशन’’ चा दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या यशस्वितेसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत या मिशनच्या रूपरेषेविषयी चर्चा झाली. लसीकरणापासून पूर्णत: वा अंशत: वंचित असलेल्या शून्य ते दोन वर्षे वयोगटातील बालके आणि गरोदर मातांचे २०२०पर्यंत पूर्णत: लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने ही मोहीम सुरू केलेली आहे. आज टास्क फोर्स समितीच्या समन्वय बैठकीत मिशन इंद्रधनुष्यच्या पहिल्या टप्प्याच्या फलनिष्पत्तीचा आढावा घेण्यात आला.या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक बी. सी. केंपी पाटील, जिपचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनवणे, विविध महापालिकांचे आरोग्य अधिकारी उपस्थित होते. जागतिक आरोग्य संघटनेतर्फे निरीक्षण वैद्यकीय अधिकारी डॉ विनायक जळगावकर यांनी उपस्थितांना मिशन इंद्रधनुष्यच्या पुढील टप्प्याविषयी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)पाच रोगांपासून बालकांची सुरक्षितताया मोहिमेतंर्गत जिल्हा आरोग्य विभागातर्फे नवजात अर्भकांना प्रत्येकी घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात यासोबतच कावीळ, क्षयरोग या लसीचाही यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे एकाच लसीकरणातून पाच रोगांपासून बालकाला सुरक्षितता लाभणार असल्याचे डॉ. जळगांवकर यांनी सांगितले. या लसीकरणाचे किमान काम झालेले देशातील २०१ जिल्हे यासाठी निवडण्यात आले आहे. अपूर्ण लसीकरण, लसीकरणापासून वंचित बालके आणि गरोदर मातांचे प्रमाण जेथे किमान ५० टक्केंपर्यंत आहे, अशा ठिकाणांची निवड या मिशनसाठी करण्यात आली आहे. त्यात ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे.