शहरं
Join us  
Trending Stories
1
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
2
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
3
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
4
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
5
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
6
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
7
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
8
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
9
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
10
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
11
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
12
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
13
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
14
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
16
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
17
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
18
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
19
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
20
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय मंडळींनो, ही ठाण्याची संस्कृती नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 07:41 IST

प्रत्येक महासभेत गोंधळ निर्माण करून प्रशासनाला अडचणीत न आणता आपला स्वार्थ साध्य करण्यासाठी १००% चुकीचे प्रस्ताव अवघ्या काही मिनिटांत मंजूर करून काय साध्य होतंय?

- अजित मांडके
मुख्य उपसंपादक

ठाणे महापालिकेत सध्या जे काही सुरू आहे ते पाहून सामान्य ठाणेकर चक्रावून गेला आहे. एकहाती सत्ता संपादित केल्यानंतरही अद्याप सत्ताधारी शिंदेसेनेला स्थायी समिती, स्वीकृत नगरसेवक आणि इतर समित्या स्थापन करता आल्या नाहीत. दुसरीकडे ठाणे महापालिकेच्या सलग तिसऱ्या महासभेत लोकशाहीची लक्तरे वेशीला टांगल्याचा प्रकार पाहायला मिळाला. याचसाठी आम्ही तुम्हाला निवडून दिले होते का? हीच का ठाण्याची राजकीय संस्कृती? असे सवाल उपस्थित होत आहेत. प्रत्येक महासभेत गोंधळ निर्माण करून प्रशासनाला अडचणीत न आणता आपला स्वार्थ साध्य करण्यासाठी १००% चुकीचे प्रस्ताव अवघ्या काही मिनिटांत मंजूर करून काय साध्य होतंय?

णे महापालिकेत शिंदेसेनेने ७५ नगरसेवक निवडून आणत एकहाती सत्ता संपादित केली. निवडणुकीत शिंदेसेना, भाजप महायुतीत लढली आणि सत्तेतही एकत्रित सहभागी झाली. शिंदेसेनेला महापौरपद, तर भाजपच्या वाटेला उपमहापौरपद आले आहे. ठाण्याच्या विकासाचा मार्ग मोकळा होईल, मुबलक पाणी मिळेल, वाहतूक कोंडीमुक्त ठाणे होईल, मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध होतील, फुटपाथ रिकामे होतील, कचऱ्याचे ढीग कमी होतील असे वाटणाऱ्या ठाणेकरांच्या नशिबी यापैकी काहीही आलेले नाही. पहिल्या महासभेपासून तिसऱ्या महासभेतही शिंदेसेना विरुद्ध भाजप कलगीतुरा सुरूच आहे. एकहाती सत्ता संपादित केल्यानंतरही स्थायी समिती, स्वीकृत नगरसेवक आणि इतर समित्या अद्याप गठित होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे स्थायी समितीचे विषय महासभेत येत आहेत.

विशेष म्हणजे तीन वर्षांच्या प्रशासकीय काळातील कामाचा हिशोब भाजप आणि विरोधी बाकांवरील नगरसेवकांनी मागितला आहे. त्याचे उत्तर प्रशासन किंवा सत्ताधाऱ्यांकडेही नाही. त्यामुळे प्रशासकीय काळात झालेले ठराव आता महासभेत आणून एक प्रकारे प्रशासनाला पाठीशी घालण्याची मोठी चूक सत्ताधारी करीत आहेत का? अशी शंका येण्यासारखी स्थिती आहे. युतीत लढलेला भाजप विरोधी पक्षाची भूमिका बजावू लागला आहे. ‘जर तुम्हाला एकत्र चूल पेटवायचीच नव्हती तर युतीत का लढलात’ असे विचारले तर त्याचे उत्तर कोण देणार? यात दोघेही दोषी आहेत.

एकाही प्रस्तावावर चर्चा न करता केवळ गोंधळ निर्माण करून प्रत्येक महासभेत २५० ते ३०० प्रस्ताव हातोहोत मंजूर केले जात आहेत. यातून सत्ताधारी कोणाची पाठराखण करत आहेत? की टक्केवारीचे राजकारण सुरू आहे? महापालिकेच्या सभागृहात होणारा गोंधळ शोभनीय नाही. 

महासभेचे थेट प्रक्षेपण व्हावे, अशी मागणी ठाणेकरांसह विरोधी पक्षाने केली आहे. त्याला बगल दिली जात आहे. दुसरीकडे एकहाती सत्ता संपादित केल्यानंतरही शिंदेसेनेला त्याचा फायदा सत्ता चालविताना होत नसल्याचे चित्र आहे. महासभेत भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार), शरद पवार आणि एमआयएमही शिंदेसेनेला वरचढ ठरत आहे. प्रत्येक महासभेत होणारा गोंधळ शोभनीय नसून ही ठाण्याची संस्कृती नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Thane's political turmoil: Council chaos is not Thane's culture.

Web Summary : Thane Municipal Corporation witnesses chaos, questioning political culture. Ruling Shinde Sena struggles, BJP opposes. Hasty approvals raise concerns of favoritism. Live broadcasts are denied, reflecting poorly on governance. This isn't Thane's culture.
टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका