शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची वाटचाल हायटेक यंत्रणेकडे

By admin | Updated: January 1, 2017 03:47 IST

हायटेक गुन्हेगारी जगताचा बिमोड करण्यासाठी पोलीस यंत्रणाही अधिकाधिक सक्षम करण्याचा विडा ठाणे पोलिसांनी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर उचलला आहे

- राजू ओढे,  ठाणेहायटेक गुन्हेगारी जगताचा बिमोड करण्यासाठी पोलीस यंत्रणाही अधिकाधिक सक्षम करण्याचा विडा ठाणे पोलिसांनी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर उचलला आहे. याशिवाय खाकी वर्दीचा कारभार जास्तीतजास्त लोकाभिमुख करण्याचे लक्ष्यही ठाण्याच्या पोलीस यंत्रणेने डोळ्यासमोर ठेवले आहे.गुन्हेगारी जगताकडून तंत्रज्ञानाचा होत असलेला दुरुपयोग दिवसागणिक वाढत चालला आहे. ठाण्यात उघडकीस आलेले खंडणीखोर कॉल सेंटरचे प्रकरण हे त्याचेच द्योतक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार झपाट्याने होत असून, सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही त्याच वेगाने वाढत आहे. ठाण्याचे सह पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी याबाबत चिंता व्यक्त करताना, हे गुन्हे हाताळण्यासाठी सायबर सेल सर्वांगाने सक्षम करण्याची गरज अधोरेखित केली. पोलीस यंत्रणेची त्यादिशेने वाटचाल सुरु आहे. सायबर सेल्सना पोलीस ठाण्यांप्रमाणे सक्षम करणे हे नववर्षातील सर्वाधिक महत्वाचे काम राहील, असे त्यांनी सांगितले. पोलीस यंत्रणा अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी विविध पातळीवर सध्या प्रयत्न सुरु आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये जनसुविधा केंद्र सुरु करण्यात आली असून, येणाऱ्या काळात ती आणखी सक्षम करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु आहेत. पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारदाराचे काम या केंद्रांमार्फत सोपे केले जाईल. सोशल मिडियाचा वापर सर्वत्र वाढत आहे. त्याअनुषंगाने फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्अ‍ॅप आदींचा वापर आणखी सक्षमपणे करून नागरिकांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जाईल. शालेय विद्यार्थ्यांना पोलीस यंत्रणेचा कारभार समजावा, यासाठी पोलीस ठाण्यांना भेटीचा कार्यक्रम करण्याचा मानस डुंबरे यांनी व्यक्त केला. गुन्हे उघडकीस आणणे, शहराच्या कानाकोपऱ्यातील माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवणे, तसेच पोलीस आणि नागरिक यांच्यात दुवा म्हणून काम करणे अशी महत्वाची भूमिका पोलीस मित्र बजावत असतात. भविष्यात ही संकल्पना आणखी सक्षमपणे राबविण्याचा निश्चयही त्यांनी व्यक्त केला. लैंगिक अत्याचार पिडितांसाठी ‘मासूम’लैंगिक अत्याचाराने पिडित अल्पवयीन मुला-मुलींची तपास प्रक्रियेदरम्यान मानसिक गैरसोय होते. पोलीस ठाण्यांमधील वातावरणामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे या पिडितांसाठी ‘मासूम’ नावाचा वेगळा कक्ष वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात लवकरच सुरु केला जाणार आहे.शिस्तीचे पालन करणाऱ्या चालकांना ‘थँक यू’यंत्रणा लोकाभिमुख व्हावी, यासाठी शिस्तीचे पालन करणाऱ्या वाहन चालकांना ‘थँक यू नोट’पाठविण्याचा उपक्रम वाहतूक शाखेने हाती घेतला आहे. ‘थँक यू इंडिया’ या संस्थेच्या मदतीने हा उपक्रम सुरु आहे. ही संस्था शिस्तप्रिय वाहनचालक हेरुन त्यांच्या घरी अशा प्रकारचे आभारपत्र पाठवते असे आशुतोष डुंबरे म्हणाले.