शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

संमेलन स्मरणिकेत काव्य, समीक्षेवर भर

By admin | Updated: December 28, 2016 03:32 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेची तयारी सुरू झाली असून, त्यामध्ये काव्य, समीक्षा, भाषा संस्कृती या विषयांवरील लेखनाला प्राधान्य दिले जाणार आहे.

- जान्हवी मोर्ये,  डोंबिवली

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेची तयारी सुरू झाली असून, त्यामध्ये काव्य, समीक्षा, भाषा संस्कृती या विषयांवरील लेखनाला प्राधान्य दिले जाणार आहे.स्मरणिकेचे संपादकीय मंडळ व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची एक बैठक अलीकडेच पार पडली. या बैठकीत स्मरणिकेवर चर्चा करण्यात आली आहे. संमेलन एका महिन्यावर येऊन ठेपले असल्याने स्मरणिका लवकरात लवकर तयार करून ती छापून संमेलनात तिचे प्रकाशन करण्याच्या दृष्टीने काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. संमेलन स्मरणिका ही स्मरणात राहावी. तसेच ती अत्यंत वाचनीय व एक उच्चतम साहित्यमूल्य असावे या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन स्मरणिका तयार केली जाणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे हे ज्येष्ठ समीक्षक असल्याने स्मरणिकेत काव्य व समीक्षेवरही अधिक भर दिला जाणार आहे. यासंदर्भातील बैठकीला महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, महामंडळाच्या सदस्या उषा तांबे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सुरेश देशपांडे आदी उपस्थित होते. लोकसाहित्य, लोकसंस्कृती, संत साहित्य यावर प्रकाश टाकणारे लेखन असेल. बोली आगरी भाषा, तिचा इतिहास याचा समावेश केला जाणार आहे. भाषेच्या जाणकारांकडून विवेचन करणारे लेखन त्यात असणार आहे. आगरी बोलीची नजाकत, तिच्यातील बारकावे, तिचे सादरीकरण कसे असेल यावर प्रकाश टाकला जाईल. आगरी समाजाविषयी गैरसमज दूर करण्यावर भर दिला जाणार आहे. आगरी समाजाची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. संमेलनाध्यक्ष व स्वागताध्यक्ष यांचे परिचय त्यात असणार आहेत. स्मरणिकेत एकूण १२ ते १३ लेख असणार आहेत.