मुंब्र्यात छताचे प्लँस्टर कोसळले भाऊ-बहिण जखमी

By कुमार बडदे | Updated: July 13, 2023 09:21 IST2023-07-13T09:21:13+5:302023-07-13T09:21:21+5:30

घटनेची माहिती संबधित विभागाला देण्यात आली असल्याची माहिती ठामपाच्या अप्तकालिन कक्षातील अधिका-यांनी दिली.

Plaster of roof collapsed in Mumbra, brothers and sisters injured | मुंब्र्यात छताचे प्लँस्टर कोसळले भाऊ-बहिण जखमी

मुंब्र्यात छताचे प्लँस्टर कोसळले भाऊ-बहिण जखमी

मुंब्राः घरातील हाँल मध्ये झोपलेल्याच्या अंगावर छताचे प्लँस्टर कोसळल्यामुळे भाऊ-बहिण किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री मुंब्र्यात घडली.शहरातील अमृत नगर भागातील मेहक अपार्टमेंन्ट या तळ अधिक पाच मजली इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरील रुम नंबर २०३ मध्ये आरीफ शेख हे त्यांच्या कुटुंबासह  भाडेतत्वावर रहात आहेत.

गुरुवारी मध्यरात्री दोन वाजता त्यांच्या रुम मधील हाँलच्या छताच्या प्लँस्टरचा काही भाग झोपलेल्या भाऊ-बहिणीच्या  अंगावर कोसळला.याबाबतची माहिती मिळताच आपत्ती व्यावस्थापन विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.या घटनेत ईब्राहिम शेख (वय ९ वर्षे) याच्या डोक्याला आणि त्याच्या ७ वर्षाच्या बहिणीच्या हाताला किरकोळ मार लागला.कळव्यातील छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात त्यांच्यावर  प्रथमोपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले.  पुढील कार्यवाहिसाठी या घटनेची माहिती संबधित विभागाला देण्यात आली असल्याची माहिती ठामपाच्या अप्तकालिन कक्षातील अधिका-यांनी दिली.

Web Title: Plaster of roof collapsed in Mumbra, brothers and sisters injured

टॅग्स :thaneठाणे