शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
7
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
8
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
9
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
10
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
11
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
12
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
13
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
14
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
15
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
16
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
17
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
18
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
19
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
20
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर पालिकेत पेनडाऊन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:16 IST

उल्हासनगर : शहर अभियंता महेश शितलानी यांच्याशी भाजप नगरसेवकांनी सोमवारी वाद घालत आरडाओरडा केल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी ...

उल्हासनगर : शहर अभियंता महेश शितलानी यांच्याशी भाजप नगरसेवकांनी सोमवारी वाद घालत आरडाओरडा केल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला. यावेळी कामगार नेते राधाकृष्ण साठे यांची मध्यस्थी अयशस्वी झाल्यावर नगरसेवकांच्या दबंगगिरीच्या निषेधार्थ कामगार संघटनेने मंगळवारी पेनडाऊन आंदोलन करून नगरसेवकांच्या दबंगगिरीचा निषेध केला.

बांधकाम विभागाकडून भाजपच्या १३ नगरसेवकांची विकासकामे होत नाही याचा जाब विचारण्यासाठी विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, भाजपचे गटनेते व शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी व नगरसेवक प्रदीप रामचंदानी असे तिघे सोमवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान बांधकाम विभागात गेले. शितलानी यांच्याशी चर्चा करीत असताना त्यांच्यात वाद झाला. यावेळी सर्वाधिक आवाज रामचंदानी यांचा येत असल्याने, महापालिका मुख्यालयात उपस्थित असलेले कामगार नेते साठे तेथे गेले. त्यांनी रामचंदानी यांना समजावत आरडाओरड करू नका, असे सांगण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शितलानी हे आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्यासोबत विकासकामे पाहण्यासाठी निघून गेले.

रामचंदानी यांनी घातलेल्या गोंधळाच्या निषेधार्थ मंगळवारी कामगारांनी पेनडाऊन आंदोलनाची हाक दिली. दुपारपर्यंत कामगार या आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र दुपारनंतर आयुक्तांच्या विनंतीला मान देत काम सुरू केल्याची माहिती साठे यांनी दिली. नेहमी वादात राहिलेल्या बांधकाम विभागाला अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी कार्यकारी अभियंता मिळालेला नाही. शितलानी यांच्याकडे शहर अभियंता पदासह बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याचा प्रभारी पदभार दिला आहे. दरम्यान, शितलानी यांची तब्येत बरोबर नसल्याने ते पूर्ण वेळ देऊ शकत नाही. आयुक्त याबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चौकट

कामाबाबत चर्चा करणे गैर आहे का?...रामचंदानी

भाजप नगरसेवकांची विकासकामे होत नसल्याचा जाब विचारण्यासाठी गेलो तर गैर काय?. चर्चेवेळी आरडाओरड झाली. कामगार संघटनेने यामध्ये पडणे कितपत योग्य आहे?. असा प्रश्न भाजप नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी केला.