शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पीक आणेवारी ५० पैशांवर

By admin | Updated: October 3, 2015 03:22 IST

राज्याच्या अनेक भागांत दुष्काळी स्थिती उद्भवली आहे. त्या तुलनेत मागील वर्षापेक्षा ठाणे जिल्ह्यात सुमारे ४६०६ मिमी पाऊस कमी पडल्याने त्याचा फटका धरणांतील पाणीसाठ्याला बसला आहे.

सुरेश लोखंडे, ठाणेराज्याच्या अनेक भागांत दुष्काळी स्थिती उद्भवली आहे. त्या तुलनेत मागील वर्षापेक्षा ठाणे जिल्ह्यात सुमारे ४६०६ मिमी पाऊस कमी पडल्याने त्याचा फटका धरणांतील पाणीसाठ्याला बसला आहे. सुदैवाने भातपिकाची स्थिती चांगली असल्यामुळे पीक आणेवारी ५० पैशांच्यावर राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.कृषी क्षेत्रातील काही जाणकारांचा कानोसा घेतला असता जिल्ह्णातील पीकस्थिती बऱ्यापैकी असून उत्पादनात काहीअंशी घट होण्याची शक्यता असली तरी पीक आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी राहणार नसल्याचा अंदाज आहे. महसूल विभागाने मागील महिन्यात पीक आणेवारीच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. त्याची गती पाहता लवकर अहवाल मिळण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी लोकमतने यासंदर्भातील कानोसा घेत शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा नाजूक विषय असल्यामुळे नाव न छापण्याच्या अटीवर काही जणांनी पीक आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी राहणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला. जिल्ह्यातील ६७ हजार हेक्टरवर खरिपाचे पीक घेतले जाते. पण, पावसाने दडी मारल्यामुळे त्याची लागवड काहीअंशी उशिराने झाली. सुमारे ९१ टक्के म्हणजे सुमारे ५९ हजार १५० हेक्टरवर भाताची लागवड पूर्ण करता आली. तीन हजार हेक्टरवर नागली, वरी या पिकांची आणि चार हजार हेक्टरवर कडधान्याची पेरणी झाली आहे. परंतु, भात ऐन पोटरीसह ओंब्या बाहेर येण्याच्या महत्त्वाच्या कालावधीत पावसाने आणखी दांडी मारली आहे.