शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पावसामुळे रस्त्यांना खड्डे; वाहनचालक त्रस्त

By admin | Updated: July 17, 2014 01:16 IST

गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका पनवेल शहरासह ग्रामीण भागाला बसला असून अनेक ठिकाणी रस्त्यांना खड्डे पडले आहेत

पनवेल : गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका पनवेल शहरासह ग्रामीण भागाला बसला असून अनेक ठिकाणी रस्त्यांना खड्डे पडले आहेत तर काही ठिकाणी मोठमोठे वृक्षसुध्दा उन्मळून पडले आहेत. तर सखल भागात पाणी साठल्याने वाहनचालकांचे हाल होत आहेत.संततधार पावसामुळे शहरातील ठाणानाका परिसर, तालुका पोलीस स्टेशन, सरस्वती विद्यामंदिरासमोरील परिसर, टपालनाका, सोसायटी आदी भागात पाणी साठण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याचप्रमाणे ठाणानाका मार्ग, टपालनाका येथील शनिमंदिरासमोर, त्याचप्रमाणे इतर भागातसुध्दा अनेक रस्त्यांना या पावसात खड्डे पडल्याने वाहन चालवणे त्रासदायक होत आहे. त्याचबरोबर कित्येक ठिकाणचे वृक्ष उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्र्रकारसुध्दा वारंवार घडत आहेत. ग्रामीण भागातसुध्दा हीच अवस्था असून मोठ्या प्रमाणात रस्त्यांना खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. गाडेश्वर धरण, कासाडी नदी, पाताळगंगा नदी, पांडवकडा धबधबा पाण्याने भरुन वाहत आहेत. यामुळे पर्यटकसुध्दा या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत. ग्रामीण भागता बळीराजा लावणी, आवटणीच्या कामाला जुंपला असून मजूर मिळत नसल्याने आदिवासी वाड्यातील मजूरांना घेऊन शेतीची कामे करुन घ्यावी लागत आहेत. एकंदरीत समाधानकारक पाऊस पडत असल्याने सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. (वार्ताहर)