शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

एकलव्य मुलांचा अभिवाचन कार्यशाळेत सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 05:00 IST

ठाणे : अभिवाचन कार्यशाळेत प्रचंड उत्साहात सहभागी झालेल्या एकलव्य मुलांना सुप्रसिद्ध अभिनेते, गांधी अंतिम पर्व या रत्नाकर मतकरीलिखित नाटकाचे ...

ठाणे : अभिवाचन कार्यशाळेत प्रचंड उत्साहात सहभागी झालेल्या एकलव्य मुलांना सुप्रसिद्ध अभिनेते, गांधी अंतिम पर्व या रत्नाकर मतकरीलिखित नाटकाचे अभिवाचक आणि अभिनेते योगेश खांडेकर, अनेक व्यावसायिक नाटकात महत्त्वाच्या भूमिका निभावणारे अभिनेते सुयश पुरोहित यांनी मार्गदर्शन केले. स्वतः अभिवाचन करून मुलांना आवाजातून भावना प्रकट करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडूनही प्रभावी अभिवाचन करून घेऊन या दोन संवेदनशील कलाकारांनी मुलांना अडीच तास गुंगवून ठेवले.

अतिशय उल्हासात आणि खेळीमेळीत; पण कोरोनासंदर्भात सर्व काळजी घेऊन पार पाडलेल्या या कार्यशाळेत ठाण्यातील मानपाडा, माजिवडा, कळवा, धर्मवीरनगर, सावरकरनगर अशा विविध लोकवस्तीतील सुमारे ५० मुली-मुलांनी सहभाग घेतला. याआधी साने गुरुजींच्या सोन्या मारुती या ग्रंथाच्या संपादित अंशाचे प्रभावी अभिवाचन सादर करणाऱ्या संस्थेच्या चमूतील मीनल उत्तुरकर यांनी त्यावेळच्या आठवणी जागवून आजच्या कार्यशाळेतून उमगलेले अभिवाचनाचे बारकावे आणि श्वासोच्छा‌वासापासून माईक कसा धरायचा इथपर्यंत मिळालेल्या टिप्स बहुमोल असल्याचे सांगितले. संस्थेच्या अध्यक्ष मनीषा जोशी, व्यवसायाने कॉर्पोरेट प्रशिक्षक असलेल्या उल्का शुक्ल यावेळी व्यासपीठावर उपस्थित होत्या. त्यांनी वंचितांचा रंगमंचावरील एकलव्य मुलांसाठी व्यक्तिमत्त्व विकासाच्या कार्यशाळा घेण्याची इच्छा व्यक्त केली. संस्थेचे विश्वस्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय मंगला गोपाळ यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. संस्थेचे खजिनदार सुनील दिवेकर यांनी या कार्यक्रमाची व्यवस्था उत्तम सांभाळली. यावेळी संस्थेचे विश्वस्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया, विश्वनाथ चांदोरकर व मान्यवर उपस्थित होते.