पालघर/नंडोरे : कच्छ युवक संघातर्फे रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलावर रंगकाम, समाजप्रबोधन चित्रे व सुशोभिकरण विद्यार्थ्यांमार्फत २४ एप्रिल पासून सुरू करण्यात आले आहे.रेल्वेने दिलेल्या परवानगीनंतर प्रथम पालघर रेल्वेस्थानकवरील पादचारी पुलाची रंगरंगोटी करून त्यावर समाज प्रबोधनात्मक चित्रे आर्यन हायस्कूलच्या ज्ञानेश्वर माळी सरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी रेखाटलीत. पाणी वाचवा व बेटी बचाओ या अभियानांची रंगीबेरंगी आकर्षक चित्रे रेखाटली गेल्याने एकाच वेळी सुशोभिकरण व समाजप्रबोधन साधले गेले आहे. ही चित्रे काढल्यामुळे आपण एक प्रकारे समाजसेवा व जनजागृती केल्याचा आनंद लाभल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. पुढे संपूर्ण पालघर रेल्वे स्थानक अशाच प्रकारे सुशोभित करण्याचा मानस युवक संघाचा असून यासाठी कलाकरांनी पुढे येऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)
पालघर रेल्वे स्थानक नटले चित्रांनी
By admin | Updated: April 25, 2016 02:53 IST