शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदर पालिका मुख्यालयात रंगले केबिन वॉर

By admin | Updated: January 18, 2016 01:48 IST

विभागाचा खांदेपालट होऊनदेखील मीरा-भार्इंदर मुख्यालयातील अधिकारी आपली दालने सोडण्यास तयार नसल्याने मीरा-भार्इंदर महापालिकेत सध्या केबिन वॉर रंगले आहे.

मीरा रोड : विभागाचा खांदेपालट होऊनदेखील मीरा-भार्इंदर मुख्यालयातील अधिकारी आपली दालने सोडण्यास तयार नसल्याने मीरा-भार्इंदर महापालिकेत सध्या केबिन वॉर रंगले आहे. सहायक आयुक्त म्हणून प्रतिनियुक्तीने आलेल्या कल्पिता पिंपळे यांच्याकडे सुरुवातीला कर, तर स्वाती देशपांडे यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग दिला होता. कर संकलक यांच्यासाठीचे पहिल्या मजल्यावरील दालन मिळालेल्या पिंपळे यांनी त्याचे नूतनीकरण करून अ‍ॅण्टी चेंबर व स्वच्छतागृह बांधून घेतले. तिसऱ्या मजल्यावरील सामान्य प्रशासनाचे दालन मिळालेल्या देशपांडे यांनीदेखील दालन सुशोभित करून अ‍ॅण्टी चेंबर बनवले. मध्यंतरी पिंपळे यांच्याकडून कर विभाग काढून घेऊन तो देशपांडे यांना देण्यात आला. तर, सामान्य प्रशासनासह पिंपळे यांच्याकडे परिवहनची जबाबदारी देण्यात आली. परंतु, त्यांनी आपले पहिल्या मजल्यावरील कर विभागाचे दालन काही सोडलेच नाही. त्यामुळे कर विभाग पहिल्या मजल्यावर असताना कर्मचारी व अधिकाऱ्यांना मात्र तिसऱ्या मजल्याचे जिने झिजवावे लागत आहेत. तीच गत सामान्य प्रशासनाशी संबंधित कर्मचारी अधिकारी यांची होत आहे. आता तर पिंपळे यांच्याकडून सामान्य प्रशासन काढून घेऊन परिवहनसह ग्रंथालय व शिक्षण विभाग दिले आहेत. हे तिन्ही विभाग नगर भवनमध्ये असून तेथे जागा उपलब्ध असताना त्या अद्यापही दालन सोडण्यास तयार नाहीत. देशपांडे यांच्याकडे कर विभागासोबत आता परवाना व बाजार लिलावाचे कामकाज सोपवले आहे. तरीही त्या सामान्य प्रशासनाचे दालन सोडत नाहीत. परिणामी, सामान्य प्रशासनाचा पदभार सोपवलेले गोविंद परब हे नगरसचिव विभागाच्या दालनात बसत आहेत. तर, आमचे दालन रिकामे करा म्हणून सचिव कार्यालयाने परब यांच्यामागे तगादा लावला आहे.