यंदा केवळ १५ टक्केच आंब्याचे उत्पादन : संजय केळकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 13:54 IST2026-04-25T13:53:39+5:302026-04-25T13:54:57+5:30
संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून 19 व्या आंबा महोत्सवाचे आयोजन 1 मे ते 10 मे या कालावधीत ठाण्याच्या गावदेवी मैदानात करण्यात आले आहे.

यंदा केवळ १५ टक्केच आंब्याचे उत्पादन : संजय केळकर
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : नैसर्गिक आपत्तीमुळे दरवर्षी आंब्याचे उत्पादन घटत चालले आहे. यंदा केवळ 15 टक्के आंब्याचे पीक हाती लागली अशी खंत आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. ते म्हणाले की यावर्षी पडलेला पाऊस, ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी मोहर जळून गेला तर काही ठिकाणी फळगळ झाली. थ्रिप्स रोग, तुडतुडा किटक्यांच्या प्रादुर्भावामुळे पंधरा टक्केच आंबा पी खाते लागले आहे मागील अकरा वर्षापासून सातत्याने कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात असल्याची माहिती त्यांनी दिली.
कोकणात एकूण एक लाख 80 हजार हेक्टर जमिनीवर आंब्याची लागवड केली जाते. 2023 सावली कोकणातील आंब्याचे उत्पन्न दोन लाख 56 हजार मेट्रिक टन होते. यातील 198 कोटी रुपयांची आंब्याची विक्री मुंबई व भारतभर केली गेली आणि 79 कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला गेला. दरवर्षी हे उत्पन्न घटत जाऊन 2024 मध्ये एक लाख 28 हजार मेट्रिक टन होते आणि 126 कोटींचा आंबा विकला गेला आणि 54 कोटींच्या आंब्याचे निर्यात केली गेली. 2025 मध्ये उत्पादन एक लाख दहा हजार मेट्रिक टन झाले असून 100 कोटी रुपयांची आंबा विक्री देशभर केली गेली, 45 कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला गेला असे आ. संजय केळकर यांनी सांगितले. कोकणातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे असेही त्यांनी सांगितले.
संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून 19 व्या आंबा महोत्सवाचे आयोजन 1 मे ते 10 मे या कालावधीत ठाण्याच्या गावदेवी मैदानात करण्यात आले आहे शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणारे आंबा महोत्सवात कोकणातील अस्सल हापूस ठाणेकरांच्या भेटीला येणार आहे या महोत्सवात कोकणी उत्पादनांचे जवळपास 35 टॉर्च लावण्यात येणार आहे यामध्ये पाच स्टॉल्स ह्या महिला बचत गटांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला आ. निरंजन डावखरे, कोकण विकास प्रतिष्ठानचे सचिव राजेंद्र तावडे व इतर उपस्थित होते.