शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कांदा अर्धे शतक पार; नवे पीक न आल्याने जुन्या कांद्याने खाल्ला भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 23:54 IST

लॉकडाऊनमध्ये कांद्याचे दर वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. कांद्याचे दर वाढले की गृहिणींचे बजेटच कोलमडते.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर वाढत चालले असून मंगळवारी त्याच्या दराने अर्धे शतक पार केले. पावसामुळे नवीन कांदा न आल्याने आणि जुना खराब झाल्याने तो संपत आला आहे. यामुळे वाढत्या मागणीने कांद्याचे दरही वाढले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

लॉकडाऊनमध्ये कांद्याचे दर वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. कांद्याचे दर वाढले की गृहिणींचे बजेटच कोलमडते. कांदा निर्यातीवर सरकारने बंदी आणल्यानंतर कांद्याचे दर कमी होतील अशी अपेक्षा असली तरी मुंबई, ठाण्यामध्ये कांद्याच्या दराची परिस्थिती वेगळी आहे.१३ आॅगस्टपासून होलसेल आणि किरकोळ बाजारात कांद्याचे दर वाढू लागले असले तरी सप्टेंबर महिन्यात जास्तच भाव खाल्ला आहे. मंगळवारी ठाण्याच्या बाजारपेठेत कांदा तब्बल ५० ते ६० रुपये प्रतीकिलो या भावाने विकला गेला.

बाजारपेठेत नवीन कांदा आलेला नाही. जून महिन्यात चांगलाच वादळी पाऊस झाला होता. त्याचा विपरीत परिणाम कांद्यावर झाल्याने उपलब्ध असलेला जुना कांदा हा खराब झाला आहे. त्यामुळे तो संपत आल्याने बाजापरेठेत ग्राहकांकडून मागणी जास्त आणि त्या तुलनेत पुरवठा मात्र कमी अशी परिस्थिती कांद्याच्या बाजारपेठेत असल्याने त्याचे दर सद्य:स्थितीत चांगलेच कडाडले आहेत. दीड महिना तरी नवीन पीक येणार नाही़ यामुळे कांदे महागच राहतील, असे कांद्याच्या विक्रेत्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.ठाणे बाजारपेठेतील कांद्याच्या दराचा चढता आलेखतारिख होलसेल किरकोळ१३ ते २० आॅगस्ट १० ते १२ १५ ते २०२० ते ३० आॅगस्ट १५ ते १६ २० ते २५१ ते १० सप्टेंबर २० ते २५ ३० ते ३५१० ते १९ सप्टेंबर २५ ते ३२ ३५ ते ४०आजचा भाव (२० सप्टेंबर) ४० ते ४३ ५० ते ६०जुुना कांदा १० ते १५ टक्केच उपलब्ध आहे. नवीन पीक येईपर्यंत जुनाच कांदा विकायचा आहे. लॉकडाऊनमध्ये बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांनी कांद्याची निगा राखली नाही. त्यात वादळी पाऊस झाल्याने तो खराब होत गेला. त्यामुळे नुकसान जास्त झाले आणि त्याचे भाव वाढले.- संदीप चौधरी,विक्रेते, ठाणेआॅगस्ट-सप्टेंबर महिन्यात कर्नाटकमधून कांदा राज्यात येतो. परंतु, पावसामुळे तो खराब झाल्याने बाजारात येऊ शकत नाही. तसेच, कांदा बी तयार करणाºया कंपन्याही चांगल्या दर्जाचे कांदे मागत आहेत. त्यांना महाग असले तरी चांगले कांदे हवे आहेत. त्यामुळे कंपन्या आणि ग्राहकांकडून मागणी आणि जुन्या कांद्याचा संपत आलेला माल यामुळे भाव वाढलेत.- शिवप्रसाद गोळवा, व्यापारी, आळेफाटा

टॅग्स :onionकांदा