शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या स्वच्छतागृहांसाठी रोटरीचे एक लाख

By admin | Updated: October 11, 2015 00:12 IST

लोकमतच्या ‘काहीतरी कर ठाणेकर’ या उपक्रमाला हातभार लावावा, या उद्देशाने रोटरी क्लब आॅफ ठाणे मेट्रोतर्फे सामाजिक बांधिलकी ठेवून विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.

ठाणे : लोकमतच्या ‘काहीतरी कर ठाणेकर’ या उपक्रमाला हातभार लावावा, या उद्देशाने रोटरी क्लब आॅफ ठाणे मेट्रोतर्फे सामाजिक बांधिलकी ठेवून विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमांतर्गत क्षयरोग तपासणी आणि सुखदा योजना राबविण्यात येत आहे.आरआय डिस्ट्रीक्ट ३१४० च्या ‘टीबी भगाओ, जिंदगी बढाओ’ या योजनेंतर्गत लोकमान्यनगर, पाडा नंबर तीन येथील २०० नागरिकांची तपासणी केली. यामध्ये जे क्षयरोगाचे रुग्ण आढळून आले आहेत, त्यांना औषधे व पुढील तपासण्या पुरवल्या जाणार आहेत. डॉ. प्रज्ञा आपटीकर, त्यांचे सात सहकारी डॉक्टर आणि आठ रोटेरिअन्स या उपक्रमात सहभागी झाले होते. या उपक्रमासाठी ठाणे महापालिकेने सहकार्याचा हात दिला आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे भारतातून पोलिओ पूर्णपणे हद्दपार झाला आहे, त्याप्रमाणे भविष्यात क्षयरोग समूळ नष्ट होण्यास मदत होईल, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष व रोटरीयन हेमंत मोंडकर यांनी बोलताना व्यक्त केला.ग्रामीण भागातील शाळांमध्ये स्वच्छतागृहांची कमतरता असल्याने मुलींची पटसंख्या कमी होते. त्या शिक्षणापासून वंचित होतात. ही दुरवस्था लक्षात घेऊन डिस्ट्रीक्ट गव्हर्नर सुभाष कुळकर्णी यांनी ‘सुखदा’ ही योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत मुलींसाठी सुसज्ज स्वच्छतागृहे बांधली जाणार आहेत. त्यासाठी रोटरी क्लब आॅफ ठाणे मेट्रो या संस्थेने एक लाख १० हजार रुपयांचा धनादेश कुळकर्णी यांच्या हाती सुपूर्द केला आहे. अनगाव येथील विद्या प्रसारक मंडळाच्या शाळेत स्वच्छतागृहे बांधणे, जुम्मा येथील शाळेत ई-लर्निंगच्या दृष्टीने आवश्यक असणारी साम्रगी पुरविणे, अशा भावी योजना क्लबने हाती घेतल्या असल्याचे फर्स्ट लेडी आॅफ दी डिस्ट्रीक्ट स्वाती कुळकर्णी यांनी सांगितले. या उपक्रमातपूजा नेमावरकर, संदीप नेमावरकर यांचे मार्गदर्शन मिळत आहे.(प्रतिनिधी)