शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही - एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 18:25 IST

Eknath Shinde : जिल्ह्यात परतीच्या पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची पाहाणी करण्यासाठी शिंदे यांनी गुरुवारी भिवंडी, शहापुर व मुरबाड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली आहे.

ठाणे : जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिस्थितीत  राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे सर्वशक्तीनिशी उभे आहे. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन शेतकर्‍यांना देत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतीसह शेतकर्‍यांच्या सर्व नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करून तसा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला गुरुवारी  दिले. 

जिल्ह्यात परतीच्या पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची पाहाणी करण्यासाठी शिंदे यांनी गुरुवारी भिवंडी, शहापुर व मुरबाड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली आहे. त्याप्रसंगी त्यांनी शेतकर्‍यांना धिलासा देत नुकसानीचे पंचनामे त्वरीत करुन अहवाल तत्काळ पाठवण्याची तंबी त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिली आहे.  या जिल्हा दौऱ्याप्रसंगी पालकमंत्र्यांनी भिवंडी तालुक्यातील कांदळी, मुरबाड तालुक्यातील शिदगाव, शहापुर तालुक्यातील वेलहोळी येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. यावर्षी एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही असे आश्वासन त्यांनी यावेळी  शेतकरी बांधवांना दिले.  

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. यावर्षी भिवंडी तालुक्यात सुमारे १६ हजार हेक्टर भातशेतीची तालुक्यात लागवड करण्यात आली होती. मात्र परतीच्या पावसाने सुमारे आठ हजार पेक्षा अधिक भात शेतीचे नुकसान झाले आहे. मुरबाड तालुक्यात १५ हजार ५११ हेक्टरपैकी सुमारे १२ हजार हेक्टर तर शहापूर तालुक्यात १४ हजार १५५ हेक्टर क्षेत्रापैकी १२ हजार ५०० हेक्टरहून भातशेतीचे नुकसान झाले असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील सर्व पिकविमा धारक शेतकऱ्यांचे सुचना पत्र प्राप्त करुन विमा कंपन्यांकडे सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले आहेत.  

पालकमंत्र्यां च्या या जिल्हा नुकसान पाहाणी दौऱ्यात ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षा सुषमा लोणे, विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर , राज्याच्या हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे , प्रांताधिकारी  मोहन नळदकर , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते, जिल्हा कृषी अधिक्षक अंकुश माने,  आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील , तहसीलदार अधिक पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदे