शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडला हवे आहे नवे बसस्थानक

By admin | Updated: February 4, 2016 01:58 IST

विक्रमगड तालुका असूनही येथे अद्ययावत एसटी बसस्थानकच नसल्याने येथील प्रवाशांना उन्हांत, पावसात, थंडीत तासनतास ताटकळत एसटीची वाट पाहावी लागते़

राहुल वाडेकर,  तलवाडाविक्रमगड तालुका असूनही येथे अद्ययावत एसटी बसस्थानकच नसल्याने येथील प्रवाशांना उन्हांत, पावसात, थंडीत तासनतास ताटकळत एसटीची वाट पाहावी लागते़ तालुक्याची लोकसंख्या जवळपास दीड लांखाच्या घरात आहे़ तर विक्रमगड गावाची लोकसंख्या २५ हजारावर गेली आहे़ येथे दररोज विविध ठिकाणी ये-जा करणाऱ्या अंदाजे ६० ते ७० एस़ टी़ बस असून त्यांना विक्रमगड शहर हे तालुक्याचे मुख्यालय आहे. सर्व सरकारी, निमसरकारी, खाजगी कार्यालये बॅका, शाळा, महाविद्यालय, इंजीनिअरिंग कॉलेज, आय़ टी़ आय व विविध आस्थापनांमध्ये काम करणारे असंख्य अधिकारी व कर्मचारी, शालेय, महाविद्यालयीन विदयार्थी व दररोजच्या कामासाठी प्रवास करणारे असंख्य प्रवासी एसटीचा वापर करीत असतात़ मात्र तालुका निर्मितीला १७ वर्षे आज झाली तरी हे शहर एसटीच्या सुसज्ज स्थानकापासून वंचित आहे. महामंडळाचे साधे पिकअप शेड आहे ते ही असून नसल्यासारखेच आहे़ कारण त्यासमोर बस थांबविण्यासाठी व प्रवाशांना उभे राहाण्यासाठीही जागा नाही कारण रस्त्यालगतच किरकोळ दुकानदारांनी दुकाने थाटली आहेत. सध्याची पिकअपशेड त्यावेळचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधीतून १७ वर्षापूर्वी बांधलेली आहे़ त्यामुळे एस़टी महामंडळाने प्रवाशांसाठी केले तरी काय असा सावाल उपस्थित केला जात आहे़ विक्रमगड शहर हे तालुक्यातील ९५ गावपाडयांचे मुख्यालय असल्याने दरारोज गाव-खेडेपाडयातून तसेच शहरातून विक्रमगमध्ये अगर विक्रमगहुन एस टी बसने विविध भागात जव्हार, मोखाडा, यंबकेष्वर, नाशिक, शिर्डी, वाडा, भिवंडी, ठाणे, डहाणू आदी ठिकाणी हजारो प्रवासी प्रवास करीत असतांत़ मात्र तालुक्याचे मुख्यालय असूनही विक्रमगडशहरात अद्यापही अद्यावत असे एस टी बसस्थानक नाही़ परिणामी प्रवाशांची मोठयाप्रमाणावर गैरसोय होत असल्यचे चित्र पहावयास मिळत आहे़ वृध्द, रुण, महिला प्रवासांसाठी प्रसाधनगृहाची, पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने प्रवाशांचे तर हाल पाहावत नाही़