नाशिक, ठाणे होणार 'इलेक्ट्रॉनिक्स हब'

By Admin | Updated: June 18, 2014 13:56 IST2014-06-18T13:56:48+5:302014-06-18T13:56:48+5:30

केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या निर्मितीवर भर देण्याची योजना आखली असून, यात राज्यातील औरंगाबाद, नागपूर, नाशिक, ठाणे या चार शहरांची निवड केली आहे.

Nashik, Thane to be the 'Electronics Hub' | नाशिक, ठाणे होणार 'इलेक्ट्रॉनिक्स हब'

नाशिक, ठाणे होणार 'इलेक्ट्रॉनिक्स हब'

गाझियाबादसह गुजरातेतील तीन शहरांचा समावेश; कंपन्यांना मिळणार अनुदान
 
नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञानासोबतच भारताची ओळख 'इलेक्ट्रॉनिक्स हब' निर्माण करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या निर्मितीवर भर देण्याची योजना आखली असून, याकरिता औरंगाबाद, नागपूर, नाशिक, ठाणे या महाराष्ट्रातील चार प्रमुख शहरांसह देशातील अन्य चार शहरांची निवड केली आहे. 
केंद्रीय दूरसंचारमंत्री रवि शंकर प्रसाद यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील चार प्रमुख शहरांसह गाझियाबाद, बडोदे, अहमदाबाद व गांधीनगर या शहरांची निवड याकरिता करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त सात पर्यावरण स्नेही इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्लस्टरच्या उभारणीवर सरकार भर देणार आहे. लहान-मोठय़ा इलेक्ट्रॉनिक वस्तूंकरिता लागणार्‍या सर्व सुट्या भागांची निर्मिती करण्यात येणार आहे. यामुळे उत्पादनाच्या खर्चात कपात होतानाच सुमारे दोन कोटी ८0 लाख लोकांना नव्याने रोजगार मिळेल, असे म्हणाले. या शहरांतून या क्षेत्राचा विकास झपाट्याने व्हावा, याकरिता सरकारने त्यांना करमाफी व अनुदान रूपाने प्रोत्साहन देण्यात येईल.सरकारच्या या योजनेअंगर्तत या शहरांतून नव्याने प्रकल्प सुरू करणार्‍या कंपन्यांना भांडवली खर्चाचा परतावा देण्यात येणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Nashik, Thane to be the 'Electronics Hub'