शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

खंडणी गोळा करणाऱ्या मुंबईतील ‘त्या’ पोलिसावर होणार अटकेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 23:42 IST

एका तोतया पोलिसासोबत वाहन चालकांकडून खंडणी उकळणा-या मुंबई पोलीस दलातील साकीनाका वाहतूक शाखेतील एक पोलीस शिपाई प्रसाद महाडीक याच्याविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तो कोरोना संशयित असल्यामुळे त्याला कॉरंटाईन करण्यात आले होते. त्याला लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली.

ठळक मुद्देमुंबई पोलीस आयुक्तांना दिली माहितीतोतया पोलिसाच्या मदतीने ठाण्यात उकळली खंडणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यामुळे कॉरंटाईन केलेल्या मुंबईच्या साकीनाका वाहतूक शाखेतील पोलिसाने चक्क ठाण्याच्या खारेगाव टोलनाका येथील वाहन चालकांकडून खंडणी उकळल्याचे रविवारी समोर आले. याप्रकरणाची माहिती मुंबईच्या पोलीस आयुक्तांना देण्यात आली असून त्याला लवकरच अटक केली जाणार असल्याची माहिती कळवा पोलिसांनी मंगळवारी दिली.ठाण्याच्या खारेगाव टोलनाका येथे पाचपाखाडीतील एका रहिवाशाकडून पाच हजारांची रोकड आणि मद्याच्या बॉटल घेतल्याप्रकरणी अमोल देवळेकर या तोतया पोलिसाला कळवा पोलिसांनी सापळा रचून अत्यंत नाटयमयरित्या ५ जुलै रोजी अटक केली. त्याच्याकडून एका कारसह बनावट ओळखपत्र, पोलीस अधिकाºयाची टोपी, पाच हजारांची रोकड आणि मद्याच्या बाटल्यांचा एक बॉक्स असा मुद्देमालही वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर आणि उपनिरीक्षक महेश कवळे आदींच्या पथकाने हस्तगत केला. त्याला या प्रकरणात अटक करण्यात आली असून मुंबई पोलीस दलातील साकीनाका वाहतूक शाखेतील एक पोलीस शिपाई प्रसाद महाडीक याच्यावरही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाडीक याला कॉरंटाईन करण्यात आले होते. त्यामुळे कळवा पोलिसांनी त्याला तूर्त नोटीस बजावली आहे. त्याचा कॉरंटाईनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याची चौकशी करुन त्याला अटकही केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांनी दिली. महाडीक हा भांडूप येथील रहिवाशी असून त्याने आणखी असे किती प्रकार केले? याबाबतही चौकशी करण्यात येत असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीExtortionखंडणी