शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

२९ जणांवर एमआरटीपी दाखल

By admin | Updated: October 8, 2015 00:17 IST

मीरा रोडच्या कनाकिया परिसरात सीआरझेडबाधित क्षेत्रावर बेकायदेशीर मातीभराव केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार पालिका प्रभाग समिती क्र. ६ चे अधिकारी दिलीप

- राजू काळे,  भार्इंदरमीरा रोडच्या कनाकिया परिसरात सीआरझेडबाधित क्षेत्रावर बेकायदेशीर मातीभराव केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार पालिका प्रभाग समिती क्र. ६ चे अधिकारी दिलीप जगदाळे यांनी मीरा रोड पोलिसांत ६ आॅक्टोबर रोजी रात्री ८.३० वा.च्या सुमारास २९ जणांवर एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. यातून एका स्थानिक बड्या राजकीय नेत्याला बगल दिल्याने पर्यावरणवाद्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असली तरी काही बड्या बिल्डरांवर मात्र गुन्हा दाखल केला आहे. केंद्र शासनाद्वारे २००० मध्ये लागू झालेल्या सीआरझेड आराखड्याला त्या वेळच्या पालिका अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे शहराचा सुमारे ४० टक्के भूभाग सीआरझेडबाधित झाला आहे. त्यातून पालिका मुख्यालयदेखील सुटले नसल्याने त्याचे विस्तारीकरण पर्यावरण विभागाच्या लालफितीत अडकले आहे. सीआरझेडखेरीज उर्वरित भूभागावर बांधकामे झाल्याने विकासक व जमीनमालक सीआरझेड क्षेत्रावर लक्ष केंद्रित करू लागले आहेत. याला राज्याचा महसूल विभाग जितका कारणीभूत आहे, तितकेच स्थानिक पोलीस व प्रशासनही जबाबदार आहे. सीआरझेडबाधित क्षेत्रात असलेले तिवर क्षेत्र नष्ट करून तेथे बेकायदेशीर मातीभराव केल्याच्या तक्रारींविरोधात महसूल विभाग केवळ कागदी घोडे नाचवून कर्तव्य पार पाडत आहे. त्यामुळे निगरगट्ट झालेले भूमाफिया खुलेआम आपले बेकायदेशीर अतिक्रमण सुरूच ठेवत आहेत. जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी प्राप्त तक्रारीनुसार कनाकिया परिसराची नुकतीच पाहणी केली होती. त्या वेळी प्रांताधिकारी परदेशी, आयुक्त अच्युत हांगे, वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत सुमारे २ लाख चौरस फुटांहून अधिक सीआरझेडबाधित क्षेत्रावर बेकायदेशीर मातीभराव केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी जमिनीच्या सातबाऱ्यावर नोंदीत व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या वेळी मीरा रोड पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलून काही व्यक्तींसह डम्पर ताब्यात घेतले होते. त्यानंतर, पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार प्रभाग अधिकारी जगदाळे यांनी ५ आॅक्टोबर रोजी जागेची पाहणी करून २९ जणांवर ६ आॅक्टोबर रोजी एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.