शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंगाच्या आरोपीच्या वडिलांची आत्महत्या

By admin | Updated: December 27, 2016 02:49 IST

विनयभंगाचा आरोप असलेल्या ओवळा परिसरातील एका युवकाच्या वडिलांनी आत्महत्या केल्याने संतप्त नागरिकांनी सोमवारी कासारवडवली पोलीस ठाण्यात त्यांचा मृतदेह

ठाणे : विनयभंगाचा आरोप असलेल्या ओवळा परिसरातील एका युवकाच्या वडिलांनी आत्महत्या केल्याने संतप्त नागरिकांनी सोमवारी कासारवडवली पोलीस ठाण्यात त्यांचा मृतदेह घेऊन ठिय्या दिला. पोलिसांवर एकतर्फी कारवाईचा आरोप करून नागरिकांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.घोडबंदर परिसरातील एका दहावीच्या विद्यार्थिनीचा तिघांनी विनयभंग केल्याची तक्रार कासारवडवली पोलीस ठाण्यात शनिवारी दाखल करण्यात आली. याच भागातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तक्रारदार मुलगी शिकत असून याबाबत पोलिसांनी शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणारा बसचालक दर्शन भोकरे (३०) यास अटक केली होती. दर्शन सध्या पोलीस कोठडीत असून एकुलत्या एक मुलावर झालेल्या या कारवाईने व्यथित होऊन त्याचे वडील नरेश महादेव भोकरे (५५) यांनी रविवारी रात्री विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. भोकरे यांचे शवविच्छेदन केल्यानंतर दर्शनची पत्नी आणि परिसरातील नागरिकांनी कासारवडवली पोलीस ठाणे गाठले. विनयभंगाचा आरोप करणाऱ्या तक्रारदार मुलीच्या पालकांनी प्रकरण आपसात मिटवण्यासाठी नरेश भोकरे यांच्याकडे पैशांची मागणी केली होती, असा आरोप या नागरिकांनी केला. या प्रकारामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करून याबाबत आपली तक्रार दाखल करण्याची मागणी दर्शनच्या पत्नीने केली. पोलिसांनी प्रतिसाद न दिल्यामुळे नागरिकांनी सायंकाळी पोलीस ठाण्यासमोर ‘रास्ता रोको’ केला. जवळपास १०० लोकांचा जमाव पोलीस ठाण्यासमोर जमला होता. पोलिसांनी दर्शनच्या पत्नीची तक्रार घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. (प्रतिनिधी) बंदोबस्तात अंत्यसंस्कारपोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नरेश भोकरे यांच्यावर मोगरपाडा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी आरोपी दर्शनला पोलीस बंदोबस्तात नेण्यात आले होते.