शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ दाम्पत्याला त्यांच्याच घरात पाय ठेवू न देणाऱ्या परप्रांतीयाला मनसेचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 09:29 IST

नेरळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लव्हाळी वाडी परिसरात संजय आणि संजना सावंत या ज्येष्ठ दाम्पत्याचा ‘माथेरान व्हॅली’ नावाचा बंगला आहे.

- विजय मांडेलोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : कर्जत तालुक्यातील नेरळमध्ये मराठी ज्येष्ठ दाम्पत्याला त्यांच्याच घरात पाय ठेवू न देणाऱ्या परप्रांतीय भाडेकरूला मनसेने चांगलाच दणका दिला. त्यामुळे २४ तासांत दाम्पत्याला हक्काच्या घराचा ताबा मिळाला. तसेच परप्रांतीयाला बोरा-बिस्तरा उचलवून तिथून काढता पाय घ्यावा लागला. 

नेरळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लव्हाळी वाडी परिसरात संजय आणि संजना सावंत या ज्येष्ठ दाम्पत्याचा ‘माथेरान व्हॅली’ नावाचा बंगला आहे. त्यांनी हा बंगला १ ऑक्टोबर २०२४ मध्ये हेमंद्र कुमार प्रसाद श्रीवास्तव या परप्रांतीय व्यक्तीस ११ महिन्यांच्या करारावर भाड्याने दिला होता. पण, करार संपल्यानंतरही श्रीवास्तव यांनी बंगला रिकामा करण्यास नकार दिला. दोन महिन्यांचे भाडे थकवले. फोन उचलणेही बंद केले. शिवाय मालकाला त्यांच्याच घरात येऊही दिले नाही. 

सावंत दाम्पत्य आत्महत्येच्या विचारापर्यंत गेले होते. मात्र, त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांची भेट घेतली. पाटील यांनी मनसैनिकांसह नेरळ गाठले. यावेळी परप्रांतीय ‘प्रोफेसर’ने पोलिसांच्या आडोशाला लपण्याचा प्रयत्न केला; पण, पोलिसांनीही घर रिकामे करण्यास सांगितल्यानंतर श्रीवास्तव यांनी बंगला सोडला. 

चावी हातात येताच चेहऱ्यावर आनंदघराच्या चाव्या मूळ मालकाच्या हातात देताच त्यांच्या चेहऱ्याववर आनंद आणि समाधान दिसले. यावेळी सावंत यांनी मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, जिल्हा सचिव अक्षय महाले, तालुकाध्यक्ष यशवंत भवारे, उपतालुकाध्यक्ष प्रवीण राणे, स्वप्निल शेळके,  करण खडे,  तेजश्री भोईर, पारस खैरे, निवृत्ती गोसावी, समीर वेहले यांचे आभार मानले.

महाराष्ट्रात परप्रांतीय व्यक्तीची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यात मनसे मागे हटणार नाही. प्रसंगी आमच्यावर गुन्हे घेऊ; परंतु, अशा व्यक्तींना मनसे स्टाईलमध्येच धडा शिकविला जाईल.- जितेंद्र पाटील, जिल्हा अध्यक्ष, मनसे 

English
हिंदी सारांश
Web Title : MNS Action: Out-of-state Tenant Ousted for Harassing Senior Marathi Couple

Web Summary : MNS intervened after an out-of-state tenant refused to vacate a senior Marathi couple's home in Nerul. The couple regained possession within 24 hours after MNS's action. The tenant was evicted for breach of contract.
टॅग्स :MNSमनसे