शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदरला डेंग्यूचा विळखा

By admin | Updated: November 10, 2015 00:40 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे चार महिन्यांत डेंग्यूच्या १२३६ रुग्णांची नोंद झाली असली तरी सीरम एलायझा पद्धतीने

धीरज परब, मीरा रोडमीरा-भार्इंदर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे चार महिन्यांत डेंग्यूच्या १२३६ रुग्णांची नोंद झाली असली तरी सीरम एलायझा पद्धतीने केलेल्या चाचणी अहवालानुसारच ६१ रुग्णांना त्याची लागण झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तर, किट चाचणी गृहीत धरली जात नसल्याने तब्बल ११७५ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे मान्य करण्यास प्रशासन तयार नसून केवळ त्यांना केवळ संशयित रुग्ण असे गोंडस नाव दिले जात आहे. यामुळे शहरातील बहुतांशी खाजगी पॅथॉलॉजी लॅब व रुग्णालयांत केल्या जाणाऱ्या महागड्या किट टेस्टबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. शहरात गेल्या काही महिन्यांत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली. खाजगी दवाखाने व रुग्णालयांत तापाचे रुग्ण सर्रास आढळतात. बहुतांशी रुग्णांना डेंग्यू, सीबीसी, मलेरिया आदी रक्त चाचण्या करण्यास सांगितले जाते. त्यात डेंग्यूच्या किट टेस्टमध्ये तो निगेटिव्ह की पॉझिटिव्ह, असा अहवाल येतो. परंतु, पालिकेचा वैद्यकीय विभाग मात्र या किट टेस्टचा अहवाल ग्राह्यच मानत नाही. सीरम एलायझा टेस्टचा अहवाल विस्तृत प्रमाणासह असल्याने तो ग्राह्य मानला जातो. भक्तिवेदान्त, वॉकहार्ट यासारख्या काही निवडक रुग्णालयांत व मॅट्रोपोलीससारख्या लॅबमध्येच ती टेस्ट केली जाते. ती सर्वसामान्यांसाठी बरीच महागडी असते.जुलै ते आॅक्टोबर या चार महिन्यांत डेंग्यूच्या १२३६ रुग्णांची नोंद पालिका आरोग्य केंद्र व खाजगी रुग्णालयांत झाली आहे. यात जुलै - १५९; आॅगस्ट - २८५; सप्टेंबर - ४३१ तर आॅक्टोबरमध्ये ३६१ रुग्ण आढळले. यापैकी सीरम एलायझा चाचणीनुसार ५६ जणांनाच डेंग्यू झाल्याचे पालिकेने मान्य केले. तर, पालिकेने अन्य ११८० रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी अवघे ५५ जणांचे नमुने पाठवले होते. त्यापैकी केवळ ५ जणांनाच तो झाल्याचा वैद्यकीय अहवाल आला. तर, ५० जणांना त्याची लागण नसल्याचे अहवालात निष्पन्न झाले. यावरून उर्वरित ११७५ जण डेंग्यूचे संशयित रुग्ण असल्याची नोंद पालिकेने केली. तर, दुधाराजा मरिया (५५), रा. आर.एन.पी. पार्क, भार्इंदर पूर्व याचा ६ आॅक्टोबर रोजी डेंग्यूने नायर रुग्णालयात मृत्यू झाल्याची नोंद आहे. पालिकेने ६१ रुग्णच डेंग्यूचे तर ११७५ रुग्ण संशयित ठरवले. मग, त्या ११७५ संशयित रुग्णांनी डेंग्यू म्हणून खाजगी लॅबमध्ये तपासणीसाठी तसेच वैद्यकीय उपचारासाठी केलेल्या लाखो रुपयांच्या खर्चाचे काय? की, डेंग्यू म्हणून निर्माण झालेल्या भीतीपोटी रुग्णांचा गैरफायदा घेतला जातोय, असे प्रश्न निर्माण होत आहेत. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कीट टेस्टमध्ये एनएस १ एन्टीजन पॉझिटिव्ह आला तर डेंग्यू झाल्याचे मानले जाते. परंतु, शासनातील वैद्यकीय अधिकारी मात्र तो पॉझिटिव्ह मानू नये, असे सांगतात. कदाचित, त्यांना डेंग्यूची आकडेवारी नियंत्रणात ठेवायची असेल. मुळात डेंग्यू हा एक प्रकारचा सेल्फ लिमिटिंग आजार आहे. शरीरातील रोगप्रतिकारकशक्तीच्या क्षमतेनुसार तो बरा होतो. केवळ १० टक्के प्रकरणात तो गंभीर बनतो. परंतु, त्याचा बाऊ केवळ बक्कळ नफ्यातला व्यवसाय म्हणून केला जात आहे का, हे पाहावे लागेल. ‘‘सीरम एलायझा पद्धतीची चाचणीच डेंग्यूसाठी ग्राह्य मानली जाते. कीट टेस्ट पद्धतीची चाचणी गृहीत धरली जात नाही. एखादा रुग्ण पॉझिटिव्ह जाणवल्यास त्याच्या राहत्या परिसरात सर्वेक्षण व उपाययोजना केल्या जातात. त्या अनुषंगानेच सारासार विचार करून मोजके नमुने जिल्हा रुग्णालयाकडे पाठवले जातात.’’- डॉ. प्रकाश जाधव (वैद्यकीय अधिकारी, मीरा-भार्इंदर महापालिका)