शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
2
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
3
ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी,'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
4
अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?
5
२३ मुलांचे बळी घेणाऱ्या 'श्रेसन फार्मा'चा उत्पादन परवाना रद्द; तामिळनाडू सरकारने कंपनी बंद करण्याचे दिले आदेश!
6
भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे 'मालक'; वाढणाऱ्या किमतीमुळे भरघोस 'रिटर्न'
7
मतचोरीची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका, न्यायमूर्तींनी दिला मोठा निर्णय, सुप्रिम कोर्टात काय घडलं?
8
टाटा-इन्फोसिससह 'हे' शेअर्स आपटले; सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा लाल रंगात; 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
9
चीननंतर अमेरिकेने सुरू केली भारताची हेरगिरी; पाळत ठेवण्यासाठी 'ओशन टायटन'ला पाठवले, कारण...
10
"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया
11
DSP सिराज नंबर वन! झिम्बाब्वेच्या गड्याला टाकले मागे; पण इथं टॉप ५ मध्ये दिसत नाही बुमराहचं नाव
12
मजुराला रस्त्याच्या कडेला सापडला एक दगड, घरी नेल्यावर कळलं की...; क्षणात आयुष्य बदलले!
13
Shani Gochar 2025: शनि देवाची खास दिवाळी भेट: २० ऑक्टोबरपासून 'या' ८ राशींच्या तिजोरीत होणार धनवृद्धी!
14
दिवाळी धमाका! 'या' कंपनीची फ्लाइंग कनेक्शन्स सेल; फक्त २००० रुपयांमध्ये करा हवाई प्रवास
15
Bihar Election 2025: प्रशांत किशोर यांनी ६५ मतदारसंघात उघडले पत्ते; कोणाला उमदेवारी?
16
कोरोनाच्या संसर्गामुळे शुक्राणूंमध्ये झाला मोठा बदल, नव्या अपत्यांमध्ये चिंता वाढली
17
GMP देतोय संकेत, ₹१५५० च्या पार लिस्ट होऊ शकतो 'हा' IPO; पहिल्यांदा जीएमपी ₹४०० पार
18
Harshita Dave : रील बनवण्याची आवड पण स्वप्न मोठी; २२ व्या वर्षी झाली डेप्युटी कलेक्टर, तुम्हीही कराल कौतुक
19
बिग बींशी उद्धटपणे बोलला, त्यांच्यावर ओरडला! शेवटी अतिआत्मविश्वास नडला, आगाऊ इशितची ५व्या प्रश्नावरच उडाली विकेट
20
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल

‘मंत्र्यांना दिवाळी साजरी करू देणार नाही’; सेवेत कायम करण्यासाठी प्रशिक्षणार्थींचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 13:41 IST

आठवडाभरात निर्णय घ्या अन्यथा ठाण्यातील नितीन कंपनीसमाेरील उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी धडक देऊ, असा इशारा संघटनेने दिला होता.

ठाणे : तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवून युवा वर्गाला हक्काच्या कायम रोजगाराचा आशेचा किरण दाखवला. या योजनेंतर्गत ११ महिने प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले. मात्र, नंतर हजारो प्रशिक्षणार्थी बेरोजगार बनले. याबाबत आठवडाभरात ठोस निर्णय घेतला नाही तर मंत्र्यांनाही दिवाळी साजरी करू देणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहायक संघटनेने दिला आहे. 

आठवडाभरात निर्णय घ्या अन्यथा ठाण्यातील नितीन कंपनीसमाेरील उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी धडक देऊ, असा इशारा संघटनेने दिला होता. मात्र, परवानगी न मिळाल्याने रविवारी   ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर सकाळी ११ ते १ दरम्यान ३६ जिल्ह्यांतील हजारो प्रशिक्षणार्थींनी  निदर्शने केली. यावेळी माेठ्या प्रमाणात पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात आला हाेता. 

कायमस्वरूपी रोजगार द्या, मानधन दुप्पट करादर महिना सहा हजार आणि हजार  मानधन देण्यासोबतच सेवेत कायम करण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. मात्र, आंदोलने करूनही सरकारी आस्थापनांमध्ये काम केलेले एक  लाख ७५ हजार प्रशिक्षणार्थी बेरोजगार बनले. मानधनात दुप्पट वाढ करा.  अधिवेशनात रोजगाराची      हमी देणारा कायदा करा आदी संघटनेच्या मागण्या आहेत.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न साेडविणार - शिंदेयाप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिल्याची माहिती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी पाटील-चाकूरकर यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संघटनेचे कार्याध्यक्ष पाटील यांच्या शिष्टमंडळाची शनिवारी ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Trainees threaten ministers: No Diwali until jobs are permanent.

Web Summary : Trainees warn ministers they will disrupt Diwali celebrations if their jobs are not made permanent. Thousands protested, demanding permanent employment and doubled salaries, threatening further action near Deputy CM Shinde's residence. Shinde promised to discuss the issue with the Chief Minister.
टॅग्स :thaneठाणेagitationआंदोलन