शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिकेत महापौर व उपमहापौर भाजपाचा की शिंदेसेनेचा? ३ फेब्रुवारीला विशेष सभा

By सदानंद नाईक | Updated: January 27, 2026 20:39 IST

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाचे चित्र स्पष्ट झालेले नाही. ३ फेब्रुवारी रोजी हे याबद्दल अंतिम निर्णय कळणार आहे.

- सदानंद नाईक, उल्हासनगर 
उल्हासनगर महापालिका महापौर व उपमहापौर निवडण्यासाठी ३ फेब्रुवारी रोजी विशेष सभा बोलावण्यात आली आहे. विशेष सभेसाठी पिठासीन अधिकारी म्हणून रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची पिठासीन अधिकारी प्राधिकृत करण्यात आले. महापौर भाजपचा की शिंदेसेनेचा याबाबत संभ्रम कायम असून भाजपने महायुतीचा महापौर होणार असल्याचे संकेत दिले.

उल्हासनगर महापालिका सार्वात्रिक निवडणुका पार पडल्या असून, कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. ७८ पैकी भाजपाचे सर्वाधिक ३७ तर शिंदेसेनेचे ३६ नगरसेवक निवडून आले. वंचितचे-२, साई पक्ष-१ व अपक्ष-१ यांनी शिंदेसेनेला पाठिंबा दिल्याने, शिंदेसेनेने बहुमताचा ४० मॅजिक फिगर पूर्ण केला. तर काँग्रेस पक्षाचे अंजली साळवे यांनी तटस्थ राहण्याचे जाहीर केले. 

शिंदेसेनेने वंचित, साई व अपक्ष नगरसेवकाच्या पाठिंब्यामुळे बहुमताचा मॅजिक आकडा पूर्ण केल्याने, शिंदेसेनेचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला. महापौर पदी वर्णी लागण्यासाठी शिंदेसेनेतील ओबीसी नगरसेवकामध्ये चढाओड लागली आहे. 

दरम्यान दोन्ही पक्षाचे नगरसेवक नॉटरीचेबल आहेत. शिंदेसेनेच्या नगरसेवका सोबत वंचित, साई व अपक्ष नगरसेवक असल्याचे बोलले जात आहे. 

पिठासीन अधिकाऱ्याची निवड 

कोकण विभागीय आयुक्तांनी महापौर व उपमहापौर निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी ३ फेब्रुवारी रोजी विशेष सभेचे आयोजन केले. पिठासीन अधिकारी म्हणून रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची नियुक्ती केली आहे. 

महापालिका महापौर व उपमहापौर निवडीसाठीचे वेळापत्रक लवकरकच प्रसिद्ध करणार आहेत. त्यानुसार निवड प्रक्रिया पार पडणार आहे. 

भाजपच्या गटनेते पदी राजेश वधारिया 

भाजपच्या ३७ नगरसेवकांची मंगळवारी कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आली असून, गटनेते पदी भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांची निवड करण्यात आली. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व निवडणूक प्रभारी प्रदीप रामचंदानी यांनी महापौर महायुतीचा होणार असल्याचे स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Ulhasnagar Mayor Election: BJP or Shinde Sena? Special Meeting on February 3

Web Summary : Ulhasnagar faces a mayoral election showdown. BJP and Shinde Sena vie for power, a special meeting on February 3 will decide the fate. BJP hints at a coalition victory.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Ulhasnagar Municipal Corporation Electionउल्हासनगर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६MayorमहापौरShiv SenaशिवसेनाBJPभाजपा