भिवंडीत गोदामांना भीषण आग; २२ गोदाम जळून खाक

By नितीन पंडित | Updated: May 12, 2025 11:55 IST2025-05-12T11:55:29+5:302025-05-12T11:55:45+5:30

केमिकल गोदामातील आग विझवण्यासाठी फोम चा वापर करण्यात येत आहे.आगीचे कारण अजून अस्पष्ट असून, मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Massive fire breaks out at godowns in Bhiwandi; 22 godowns gutted | भिवंडीत गोदामांना भीषण आग; २२ गोदाम जळून खाक

भिवंडीत गोदामांना भीषण आग; २२ गोदाम जळून खाक

- नितीन पंडित
लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी: मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील वडपे येथील रिचलँड कॉम्प्लेक्समधील भल्या मोठ्या गोदामास सोमवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. या गोदाम संकुलात एकूण २२ गोदाम आगीच्या भक्षस्थानी पडले असून या गोदामात कपडे, बूट, केमिकल, इलेक्ट्रॉनिकस साहित्य मोठ्या प्रमाणावर साठवलेले होते. यामुळे या गोदामांमध्ये साठवलेला कोट्यावधी रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. आगीची माहिती मिळताच भिवंडीसह कल्याण येथील प्रत्येकी दोन अशा चार अग्निशामक दलाच्या गाड्या  घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू केले. परंतु पाण्याची कमतरता असल्याने आग विझवण्यास अडचण येत होती.

केमिकल गोदामातील आग विझवण्यासाठी फोम चा वापर करण्यात येत आहे.आगीचे कारण अजून अस्पष्ट असून, मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

या आगीत के. के. इंडिया पेट्रोलियम स्पेसियालिटीज प्रा.ली., कॅनन इंडिया प्रा.ली.कंपनी, ब्राईट लाईफकेअर प्रा.लि.कंपनी, होलीसोल प्रा.ली.  कंपनी, एबॉट हेल्थकेअर प्रा.ली कंपनी, डेकोरेशन साहित्याचे मोठे गोदाम आहेत. या गोदामात मोठ्या प्रमाणात केमिकल, प्रिंटिंग मशीन, इलेक्ट्रॉनिक साहित्य,आरोग्य संबंधित प्रोटीन खाद्यपदार्थ पावडर, कॉस्मेटिक साहित्य, कपडे, बूट, मंडप डेकोरेशन साहित्य व फर्निचर साठवण्यात आले होते.अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आठ तासांनी ही आग आटोक्यात आली असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे.
 

Web Title: Massive fire breaks out at godowns in Bhiwandi; 22 godowns gutted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग