शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

मढवी शाळा परिसरात अनेक समस्या

By admin | Updated: September 23, 2015 03:57 IST

केडीएमसीत मैदानांची वानवा असतांना महापालिकेच्या ९२ क्रमांकाच्या मढवी शाळा या परिसरातील वॉर्डमध्ये ३ ठिकाणी मैदानांचे आरक्षण आहे

अनिकेत घमंडी, डोंबिवलीकेडीएमसीत मैदानांची वानवा असतांना महापालिकेच्या ९२ क्रमांकाच्या मढवी शाळा या परिसरातील वॉर्डमध्ये ३ ठिकाणी मैदानांचे आरक्षण आहे. सुदैवाने ते सुस्थितीत आहे. मात्र, त्यातील नानासाहेब धर्माधिकारी उद्यान वजा मैदानाची पावसाने त्याची दुरवस्था झाली आहे. सर्वत्र पाणी साचलेले असून झोपाळे, खेळायची अन्य साधने यांच्यापर्यंत चिमुरडे जाऊही शकत नाहीत. याच भुखंडाशेजारील जागेतही ज्ञानेश्वर माऊलींच्या नावे अन्य एक भूखंड आहे. परंतु, त्याची योग्य निगा न राखल्याने तेथे हिरवळ, झाडी झुडपे उगवलेली आहेत. याखेरीज वॉर्डात कचराकुं डी नसली तरीही स्वच्छता नसल्याने नागरिक हैराण आहेत. भटक्या कुत्र्यांचीही समस्या गंभीर असून त्यामुळेही रहिवासी त्रस्त आहेत. गल्लीबोळांचे रस्ते असून त्यात पेव्हर ब्लॉक असले तरीही पक्के रस्ते हवेत, अशी अपेक्षा आहे. काही धोकादायक इमारती आहेत त्यामध्ये राहणाऱ्या भाडेकरु-मालक यांच्यातील समन्वयाचा अभाव असल्याने गुंता सुटता सुटत नाही. अनधिकृत बांधकामांचा प्रश्न जैसे थे असून नगरसेविका ते थांबवू शकलेल्या नाहीत. त्यामुळेही वॉर्डाचा विस्तार कसाही झाला आहे. आपत्कालीन स्थितीत वॉर्डात गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. काही ठिकाणी गटारे उघड्या असल्यानेही नागरिकांना त्रास होतो. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी रेलचेल असली तरीही विशेष नियोजन नसते. नागरिक आपापल्या परिने धार्मिक सलोखा टिकून राहण्यासाठी प्रयत्न करतात. एका ठिकाणी झोपडपटट्टी परिसर असून तेथे सुमारे १०० घरे आहेत. त्या ठिकाणच्ता शौचालयाला डागडुजीचीची तर परिसराला स्वच्छतेची आणि पायवाटा चांगल्या असण्याची अपेक्षा आहे. केडीएमटीची बससेवा वॉर्डात येत नाही,अंतर्गत रस्त्यांना फारशा प्रमाणात रिक्षाही जात नसल्याने प्रवाशांचे हाल होतात. कोपरसह डोंबिवली रेल्वे स्थानक नागरिकांना सोयीस्कर असले तरीही कोपरला जातांना नाकीनऊ येत असल्याने बहुतांशी नागरिक डोंबिवलीतूनच प्रवास करतात. सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने तसेच त्यासाठी कोणीही जागा देत नसल्यानेही ती सुविधा येथे नाही.